आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसा निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन - निलेश शेंडगे


 पारनेर 


10 मार्च 2022 रोजी तालुक्याचे लोकप्रिय आमदार लोकनेते निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त कुरुंद ग्रामपंचायत सदस्य पत्रकार निलेश शेंडगे यांनी निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे तरी सदर स्पर्धेचा विषय- लोकनेता आमदार निलेश लंके असून याविषयी निबंध पाठवण्याचे आव्हान आयोजक शेंडगे यांनी केले आहे. सहभागी  स्पर्धकांमधून तीन क्रमांक काढले जातील व त्यांना योग्य ते बक्षीस आमदार निलेश लंके यांच्या हस्ते देण्यात येईल व सहभागी स्पर्धकांना आमदार निलेश लंके यांची स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र देण्यात येईल अशी माहिती शेंडगे यांनी दिली, निलेश शेंडगे मित्र परिवार ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विशेष सहकार्य करत आहे.


 आमदारांचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचावे तसेच विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा आदर्श पोहोचावा यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शेंडगे हे विविध स्पर्धांचे आयोजन सतत करत असतात त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

Post a Comment

0 Comments