पिंपरी जलसेनचा विजप्रश्न चिघळणार वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा आंदोलन ; ग्रामस्थांचा इशारा

 

पारनेर प्रतिनिधी

शेतपंपा सोबत घरगुती विजेचा लपंडाव सुरू आहे. शेतीसाठी ६ तास वीजपुरवठा होत असून प्रत्यक्षात दिवसात १ तास देखील पूर्णदाबाने वीज मिळत नसल्याने शेतकऱ्यांची पिके जळून चालली आहे.महावितरण कडून वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा अन्यथा पिंपरी जलसेन ग्रामस्थ शेजारच्या इतर गावांतील ग्रामस्थांसमवेत आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.


       महावितरणाकडून सध्या शेतीसाठी ६ तास वीजपुरवठा केला जातो. परंतु प्रत्यक्षात ६ तासांमध्ये अवघी १ तास वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांना शेतीला पाणी देऊन होत नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू असून पिकांना पाण्याची गरज आहे. त्यात सध्या पाण्याचा तुटवडा भासायला लागला आहे. त्यात महावितरणकडून पूर्ण दाबाने वीज मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. विजेचा एवढा लपंडाव सुरू आहे की शेतीपंप सुरू करून शेतकरी शेतात जाई पर्यंत वीज जात असल्याने शेतकऱ्यांना शेती ते विहीर यामध्ये खूप पायपीट करावी लागत आहे. महावितरण कडून यापूर्वी १२ तास वीजपुरवठा केला जात होता. त्यानंतर महावितरणाच्या कडून विजेत कपात करून ८ तास करण्यात आली. त्यानंतर पुन्हा कपात करून ६ तास करण्यात आली. आता ६ तास वीज केली असताना देखील वीजपुरवठा पूर्ण दाबाने होत नाही. विजबिले मात्र नियमित भरण्यासाठी महावितरण कडून तगादा लावला जात आहे. विजबिले भरून देखील पूर्णदाबाने वीजपुरवठा होत नाही. शेतपंपाचा वीजपुरवठा तास पूर्णदाबाने करण्यात यावा. अन्यथा महावितरणाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा पिंप्री जलसेन सह परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments