कान्हूर पठार मधील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद डॉ श्रीकांत पठारे यांच्यावतीने मोफत आरोग्य शिबीर पंधरवडा

 

पारनेर प्रतिनिधी

डॉ श्रीकांत पठारे यांच्यावतीने सुरू असलेल्या मोफत सर्वरोग निदान शिबिराला कान्हूर पठारमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. डॉ पठारे यांच्यावतीने  पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार जिल्हा परिषद गटात मोफत सर्वरोग निदान आरोग्य शिबीर पंधरवडा सुरू आहे. 


      शनिवारी दि. ४ डिसेंबर कान्हूर पठार येथे डॉ. श्रीकांत (आण्णा) पठारे मित्र परिवार आयोजित मोफत सर्वरोग निदान शिबीर पार पडले. यावेळी डॉ. श्रीकांत( आण्णा) पठारे , डॉ.पद्मजाताई पठारे, कान्हूर पठार चे लोकनियुक्त सरपंच गोकूळ मामा काकडे, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष पाटील ठुबे, ग्रामपंचायत सदस्य विशाल लोंढे, शिवसेना महिला तालुका आघाडी प्रमुख प्रियांका खिलारी, युवासेना उपतालुका प्रमुख अमोल ठुबे, महात्मा फुले युवा दल जिल्हाप्रमुख गणेशभाऊ तांबे,अविनाश देशमुख, गोरख लोंढे,रुषाल ठुबे, रविंद्र ठुबे , तेजस ठुबे, व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कान्हूर पठार मधील शेकडो रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला.

       डॉ श्रीकांत पठारे यांनी सुरू केलेल्या आरोग्य शिबिराला तालुक्यात  प्रतिसाद मिळत आहे. डॉ पठारे यांचे सामाजिक काम लोकाभिमुख असून कोव्हीड काळात कोव्हीड सेंटरच्या माध्यमातून हजारो रुग्णांना जीवदान देणाऱ्या डॉ पठारे कुटुंबियांबद्दल कान्हूर पठार मधील नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली.


         डॉ श्रीकांत पठारे यांच्या वतीने आयोजित केलेले शिबीर कान्हूर पठार गटातील सर्व गावांत होणार आहे. त्यामध्ये अनुक्रमे अक्कलवाडी, पाडळी दर्या, जाधववाडी, बाबुळवाडे, राऊत वाडी, वेसदरे, वडझिरे, विरोधी, कान्हुर पठार, पुणेवाडि, करंदी, किन्हीं, बहिरोबा वाडी, पिंपळगाव, हत्तलखिंडी आदी गावांमध्ये शिबीर होणार असून जास्तीत जास्त रुग्णांनी सहभाग घ्यावा असे आवाहन डॉ श्रीकांत पठारे व डॉ पद्मजा पठारे यांनी केले आहे. शिबिरासाठी डॉ श्रीकांत पठारे 9226129131, डॉ पद्मजा पठारे 9422756749, प्रमोद पठारे 9763860486, प्रशांत निंबाळकर 8600082287 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments