पारनेर प्रतिनिधी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत स्वतःचा जीव धोक्यात घालून कोव्हीड सेंटरच्या माध्यमातून डॉ श्रीकांत पठारे यांनी सर्वसामान्य कोरोना रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. सध्या मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जनतेची सेवा करणारे डॉ श्रीकांत पठारे हे गोरगरीब जनतेचे देवदूत असल्याची प्रतिक्रिया पुणेवाडी येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली.
डॉ. श्रीकांत पठारे मित्र मंडळ आयोजित सर्व रोग निदान शिबिर पुणेवाडी या ठिकाणी आज पार पडले. शिबिरात गोर गरीब गरजू २२३ रुग्णांनी सहभाग नोंदवला. गोर गरीब रुगणानी डॉ. पठारे खरे गोर गरीबांचे देवदूत आहेत अशा भावना बोलून दाखवली. शिबिरात सर्व औषधे मोफत दिली गेली. शिबिराचे उद्घाटन पुणेवाडी चे माजी सरपंच रवींद्र पुजारी साहेब, सेवा संस्थेचे चेरमन बाबासाहेब रेपाळे,उपसरपंच विशालजी दुश्मन , सेवा संस्था उपाध्यक्ष बाबाजी पोटे, रमेश डमरे,सीताराम बापू पुजारी, बाबाजी दुश्मन, सुभाष चेडे, शिवाजी रेपाळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू बोरुडे(युवा सेना कान्हूर पठार गण प्रमुख), स्वप्नील पुजारी,(ग्रामपंच्यायत सदस्य) अक्षय दुश्मन, मयूर चेडे , शुभम बोरुडे, अक्षय बोरुडे, हिरामण चेडे, संदीप निघुल, अविनाश वाढवणे,हर्षल पवार, आनिकेत मगर, संकेत चेडे ,चैतन्य बोरूडे, इत्यादींनी प्रयत्न केले. शिबिरास मोठ्या संख्येने ग्रामस्थ व तरुण उपस्थित होते.
डॉ श्रीकांत पठारे यांच्या वतीने आयोजित केलेले शिबीर कान्हूर पठार गटातील सर्व गावांत होणार आहे. त्यामध्ये अनुक्रमे अक्कलवाडी, पाडळी दर्या, जाधववाडी, बाबुळवाडे, राऊत वाडी, वेसदरे, वडझिरे, विरोधी, कान्हुर पठार, पुणेवाडि, करंदी, किन्हीं, बहिरोबा वाडी, पिंपळगाव, हत्तलखिंडी आदी गावांमध्ये शिबीर होणार असून जास्तीत जास्त रुग्णांनी सहभाग घ्यावा असे आवाहन डॉ श्रीकांत पठारे व डॉ पद्मजा पठारे यांनी केले आहे. शिबिरासाठी डॉ श्रीकांत पठारे 9226129131, डॉ पद्मजा पठारे 9422756749, प्रमोद पठारे 9763860486, प्रशांत निंबाळकर 8600082287 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments