डॉ श्रीकांत पठारे यांचे सामाजिक व वैद्यकीय सेवाभाव अद्वियीय - सरपंच नामदेवराव ठाणगे

 

पारनेर तालुक्यातील करंदी येथे मोफत सर्वरोग निदान शिबीर संपन्न

पारनेर प्रतिनिधी

     स्वतःचा खासगी दवाखाना असताना देखील तालुक्यात आरोग्यशिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेवर डॉ श्रीकांत पठारे हे मोफत उपचार देणारे राज्यातील एकमेव डॉक्टर आहेत. त्यांचे वैद्यकीय सेवेतील व सामाजिक काम राज्यात अद्वितीय असून वाखाणण्याजोगे असल्याचे मत करंदी गावचे सरपंच नामदेवराव ठाणगे यांनी व्यक्त केले.



  डॉ श्रीकांत पाठरे व मित्रपरिवार तसेच ओंकार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पारनेर यांच्यावतीने पारनेर तालुक्यात मोफत सर्वरोग निदान शिबिर सुरू आहे. सोमवारी दि.६ डिसेंबर रोजी तालुक्यातील करंदी येथे आरोग्य शिबीर संपन्न झाले. शिबिराचे उदघाटन सरपंच नामदेवराव ठाणगे यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, डॉ पठारे यांचा स्वतःचा खासगी दवाखाना असताना देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हजारो रुग्णांना कोव्हीड सेंटरच्या माध्यमातून मोफत उपचार देऊन जीवदान दिले आहे. त्यांच्या या सेवेबद्दल राज्यभरातून त्यांचे कौतुक करण्यात आले होते. याशिवाय डॉ पठारे हे पंचायत समिती सदस्य असल्याने अनेक समाजपयोगी कामे त्यांनी  मार्गी लावले आहेत. करंदी येथे झालेल्या शिबिरात १७५ रुग्णांनी लाभ घेतला.  यावेळी सरपंच नामदेवराव ठाणगे, उपसरपंच भास्कर गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य जितुभाऊ उघडे, अशोक चौधरी, अशोक ठाणगे, शिवामामा कुलट, ग्रा.प सदस्य बाळासाहेब औटी, अर्जुन ठाणगे,साहेबराव चौधरी, रामदास ठाणगे,भाऊ ठाणगे,आकाश फराटे,रामभाऊ गांगड, नवनाथ ठाणगे,विश्वनाथ आतकर, संतोष ठाणगे, राधुजी ठाणगे, सावळेरम ठाणगे, भाऊसाहेब पिंपरकर, प्रदीप गांगड, जिजाभाऊ थोरात, सुरेश गांगड, नाना चौधरी, दिलीप चौधरी,राजुमामा केदार, दौलत चौधरी, राजू चौधरी आदींसह ग्रामस्थ व रुग्ण उपस्थित होते.


    डॉ श्रीकांत पठारे यांच्या वतीने आयोजित केलेले शिबीर कान्हूर पठार गटातील सर्व गावांत होणार आहे. त्यामध्ये अनुक्रमे अक्कलवाडी, पाडळी दर्या, जाधववाडी, बाबुळवाडे, राऊत वाडी, वेसदरे, वडझिरे, विरोधी, कान्हुर पठार, पुणेवाडि, करंदी, किन्हीं, बहिरोबा वाडी, पिंपळगाव, हत्तलखिंडी आदी गावांमध्ये शिबीर होणार असून जास्तीत जास्त रुग्णांनी सहभाग घ्यावा असे आवाहन डॉ श्रीकांत पठारे व डॉ पद्मजा पठारे यांनी केले आहे. शिबिरासाठी डॉ श्रीकांत पठारे 9226129131, डॉ पद्मजा पठारे 9422756749, प्रमोद पठारे 9763860486, प्रशांत निंबाळकर 8600082287 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments