वडझिरेत डॉ.श्रीकांत पठारे यांनी आणली आरोग्य गंगा.

 बातमी प्रतिनिधी:-महेश शिंगोटे.रोखठोक न्यूज पारनेर.

        वडझिरे येथे पं.स.सदस्य डॉ.श्रीकांत पठारे आणि  मित्रपरिवार व ओंकार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,पारनेर यांच्या सौजन्याने भव्य मोफत सर्व रोगनिदान शिबीर आयोजित केले होते.शिबिराचे उदघाटन सरपंच निलेश केदारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या शिबिरामध्ये १४२ रुग्णानी सहभाग घेतला.यावेळी डॉ.के.आर.हांडे बी.आर.हांडे,डॉ.अभय मोरे,सतीश शेटे यांनी सहकार्य केले.डॉ.पठारेंनी तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत विकासाची आरोग्यगंगा पोहचवली आहे.गोरगरीब सर्वसामान्य जनतेला आधार देण्याचे काम डॉ.पठारे करत आहेत. जनताही त्यांना उत्तम प्रतिसाद देत आहे.


यावेळी बोलताना शिवसेना नेते उपसरपंच किसनराव चौधरी यांनी डॉ.पठारेंचे कौतूक केले.मा.उपसरपंच विवेक मोरे पाटील म्हणाले,डॉ.श्रीकांत पठारेंनी कोरोना काळात जनतेची उत्कृष्ट सेवा केली आहे. त्याचबरोबर आता शिबिराच्या माध्यमातून पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी स्वतःला झोकून दिले आहे.येणारा काळ हा डॉ.श्रीकांत पठारेंसाठी नक्कीच उज्ज्वल असेल.

प्रसंगी मा.सरपंच पोपटराव शेटे, ग्रा.सदस्य संतोषशेठ दिघे,तंटामुक्ती अध्यक्ष डॉ.गणेश चौधरी,सदस्य बाळासाहेब सपकाळ,,सुनिल करकंडे,लहुशेठ चौधरी,संतोषशेठ खिलारी,बाबाजीशेठ लंके टेलर्स,राजाभाऊ मोरे,संतोष मोरे,सावकार सपकाळ,बापूसाहेब रोकडे,पंढरीनाथ मोरे मेजर,विशाल मोरे,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.सर्व ग्रामस्थांच्या वतीने शिवसेना शाखा प्रमुख संतोषशेठ रोकडे आणि सामाजिक कार्यकर्ते युवराज मोरे यांनी डॉ.श्रीकांतजी पठारे साहेबांचे आभार मानले.

         डॉ श्रीकांत पठारे यांच्या वतीने आयोजित केलेले शिबीर कान्हूर पठार गटातील सर्व गावांत होणार आहे. त्यामध्ये अनुक्रमे अक्कलवाडी, पाडळी दर्या, जाधववाडी, बाबुळवाडे, राऊत वाडी, वेसदरे, वडझिरे, विरोधी, कान्हुर पठार, पुणेवाडि, करंदी, किन्हीं, बहिरोबा वाडी, पिंपळगाव, हत्तलखिंडी आदी गावांमध्ये शिबीर होणार असून जास्तीत जास्त रुग्णांनी सहभाग घ्यावा असे आवाहन डॉ श्रीकांत पठारे व डॉ पद्मजा पठारे यांनी केले आहे. शिबिरासाठी डॉ श्रीकांत पठारे 9226129131, डॉ पद्मजा पठारे 9422756749, प्रमोद पठारे 9763860486, प्रशांत निंबाळकर 8600082287 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments