कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे यांना उपक्रमशील कलाशिक्षक प्रेरणा राज्य पुरस्कार

 जळगावच्या ललित कला केंद्र चोपडा यांच्यावतीने पुरस्कार जाहीर

पारनेर प्रतिनिधी

      पारनेर तालुक्यातील कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे हे त्यांच्या कलेच्या माध्यमातून नेहमीच सातासमुद्रापार चर्चेत राहिले आहेत. त्यांच्या हस्तकलेला अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले असून नुकतेच जळगाव येथील ललित कला केंद्र चोपडा यांनी कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे यांना श्रीमती प्रा. शोभना कोळी एरंडोल/जळगाव पुरस्कृत कलाशिक्षक रविराज कोळी पाचोरा स्मृती उपक्रमशील कलाशिक्षक प्रेरणा राज्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराचे वितरण ५ डिसेंबर रोजी जळगावात होणार आहे.


      कलाशिक्षक ज्ञानेश्वर रामदास कवडे हे पारनेर तालुक्यातील पाबळ गावचे आहेत. ते सध्या पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कुल येथे अध्यापनाचे काम करत आहेत. कलाशिक्षक कवडे यांचे फलक लेखन, अक्षरगणेश, भित्तिचित्रे, पर्यावरण पूरक गणेशोत्सव, निसर्गाची हाताने रेखाटलेली चित्रे हे राज्यभरात प्रसिद्ध असून त्यांच्या अक्षरगणेशाला परदेशातूनही मागणी आहे. त्यांच्या याच हस्तकलेबद्दल त्यांना अनेकदा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. असेच जळगाव येथील ललित कला केंद्र चापोडा यांच्यावतीने श्रीमती प्रा. शोभना कोळी, एरंडोल/जळगाव पुरस्कृत कलाशिक्षक रविराज कोळी पाचोरा स्मृती उपक्रमशील कलाशिक्षक प्रेरणा राज्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.या पुरस्काराचे वितरण ५ डिसेंबर रोजी भगिनी मंडळ चोपडा जिल्हा जळगाव येथे शैक्षणिक संकुलातील सभागृहात महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष ना. अरुनभाई गुजराथी यांच्या शुभहस्ते आणि चित्रकला व शिल्प महाराष्ट्र राज्य निरीक्षक प्रा. संदीप डोंगरे, अखिल महाराष्ट्र राज्य शै कलाशिक्षक संघाचे माजी अध्यक्ष मुख्याध्यापक मल्लिकार्जुन सिंदगी, पुणे व अखिल महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक संघाचे सरचिटणीस एस डी भिरुड यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 

        अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे विद्यमान अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील,उपाध्यक्ष रामचंद्र दरे,सचिव जी.डी.खानदेशे साहेब,विश्वस्त सिताराम खिलारी सर,विश्वस्त जयवंत वाघ साहेब,पारनेर मा.पं.स.सभापती राहुल भैया झावरे,जिल्हा कला शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पठाडे तसेच विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब करंजुले,उपप्राचार्य गोरक्ष रेपाळे,पर्यवेक्षक अंकुश अवघडे व सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी सर्व मित्रपरिवार यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

 

   कलाशिक्षक कवडेंच्या हस्तकलेमुळे पारनेरची राज्यात वेगळी ओळख - अनिल शेटे

कलाशिक्षक ज्ञानेश्वर रामदास कवडे यांच्या हस्तकलेमुळे त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहे. त्यांच्या अक्षरगणेशाला तर सातासमुद्रापार मागणी आहे. कवडेंच्या कलेमुळे अनेक राज्यस्तरीय पुरस्कार कवडेंना बहाल होत आहेत. ज्ञानेश्वर कवडेंच्या हस्तकलेमुळे कलाक्षेत्रात महाराष्ट्र राज्यात पारनेरचे वेगळे स्थान व वेगळी ओळख कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडेंनी निर्माण केले असल्याचे मत शिवबा संघटना संस्थापक अध्यक्ष अनिल शेटे यांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments