डॉ श्रीकांत पठारेंची आरोग्यगंगा वाड्या-वस्त्यांवर पोहोचली

डोंगरदऱ्याच्या कुशीत वसलेल्या राउतवाडीत सर्वरोग निदान शिबीर

चंद्रकांत कदम पारनेर

       डॉ श्रीकांत पठारे हे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यसेवेच्या बाबतीत तालुक्यात नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहेत. समाजातील तळागाळातील व गोरगरीब जनतेला मोफत आरोग्य सेवा देणे त्यांच्या "या दातृत्वाबद्दल" समाजात डॉ श्रीकांत पठारे यांची वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. 


        पारनेर तालुक्यातील वडझिरे भागातील डोंगरदऱ्याच्या कुशीत वसलेल्या निसर्गसंपन्न राऊतवाडी मध्ये आज डॉ श्रीकांत पठारे यांचे मोफत सर्वरोग निदान शिबीर संपन्न झाले. प्रत्येक गावातील गरजूंना मोफत उपचार पोहोचवणे हेच "ध्येय" डॉ श्रीकांत पठारे,डॉ पद्मजा पठारे व मित्रपरीवाराने ठेवले आहे. याच उद्देशाने पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार गटातील सर्व गावांत मोफत सर्वरोग निदान शिबिर आयोजित केले आहे.दिवसेंदिवस या शिबिरात रुग्णांचा ओघ वाढत असून चांगला प्रतिसाद वाढत आहे. राऊतवाडी येथे झालेल्या शिबिराप्रसंगी माजी सरपंच मनीषा राऊत, ग्रा प सदस्य पुष्पा राऊत, माजी चेअरमन कैलास राऊत, माजी व्हा चेरमन तुळशीराम राऊत, सोसायटी संचालक किसन राऊत, गौतम राऊत, भाऊसाहेब राऊत, प्रभाकर राऊत, शिवाजी राऊत, राजकुमार राऊत, रामदास राऊत सर, मच्छीन्द्र राऊत सर, भागचंद राऊत मेजर, अनिल राऊत, मंगल राऊत, रखमाबाई राऊत यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सुमारे ९२ रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला.


    डॉ श्रीकांत पठारे यांच्या वतीने आयोजित केलेले शिबीर कान्हूर पठार गटातील सर्व गावांत होणार आहे. त्यामध्ये अनुक्रमे अक्कलवाडी, पाडळी दर्या, जाधववाडी, बाबुळवाडे, राऊत वाडी, वेसदरे, वडझिरे, विरोधी, कान्हुर पठार, पुणेवाडि, करंदी, किन्हीं, बहिरोबा वाडी, पिंपळगाव, हत्तलखिंडी आदी गावांमध्ये शिबीर होणार असून जास्तीत जास्त रुग्णांनी सहभाग घ्यावा असे आवाहन डॉ श्रीकांत पठारे व डॉ पद्मजा पठारे यांनी केले आहे. शिबिरासाठी डॉ श्रीकांत पठारे 9226129131, डॉ पद्मजा पठारे 9422756749, प्रमोद पठारे 9763860486, प्रशांत निंबाळकर 8600082287 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments