डॉ श्रीकांत पठारेंनी सुरू केलेल्या सर्वरोग शिबिरातून गरीब व गरजू जनतेला मिळतोय मोफत उपचार - सरपंच रामदास खोसे

 


पारनेर प्रतिनिधी

डॉ श्रीकांत पठारे व मित्रपरिवाराच्या वतीने सुरू केलेल्या सर्वरोग निदान शिबिरामुळे अनेक गरीब व गरुजू रुग्णांना मोफत उपचार मिळत असल्याचे मत पाडळी दर्या चे सरपंच रामदास खोसे यांनी व्यक्त केले.


    पारनेर तालुक्यातील पाडळी दर्या येथे डॉ श्रीकांत पठारे व ओंकार हॉस्पिटल पारनेर यांच्यावतीने मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. त्याप्रसंगी सरपंच गावातील रुग्णांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी सरपंच रामदास खोसे, उपसरपंच मारुती खोसे, माजी सरपंच नामदेव खोसे, दिलीप खोसे, चेअरमन डॉ शिवाजी खोसे आदिंसह ग्रामस्थ व रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाडळी दर्या येथील सुमारे २१० रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेऊन उपचार घेतले. तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी व नागरिकांच्या आरोग्यासाठी यापुढील काळात देखील अश्याच प्रकारचे शिबीर आयोजित करून समाजातील तळागाळातील जनतेला आरोग्य सेवा पुरविणार असल्याचे पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांनी सांगितले.

       डॉ श्रीकांत पठारे यांच्या वतीने आयोजित केलेले शिबीर कान्हूर पठार गटातील सर्व गावांत होणार आहे. त्यामध्ये अनुक्रमे अक्कलवाडी, पाडळी दर्या, जाधववाडी, बाबुळवाडे, राऊत वाडी, वेसदरे, वडझिरे, विरोधी, कान्हुर पठार, पुणेवाडि, करंदी, किन्हीं, बहिरोबा वाडी, पिंपळगाव, हत्तलखिंडी आदी गावांमध्ये शिबीर होणार असून जास्तीत जास्त रुग्णांनी सहभाग घ्यावा असे आवाहन डॉ श्रीकांत पठारे व डॉ पद्मजा पठारे यांनी केले आहे. शिबिरासाठी डॉ श्रीकांत पठारे 9226129131, डॉ पद्मजा पठारे 9422756749, प्रमोद पठारे 9763860486, प्रशांत निंबाळकर 8600082287 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments