डॉ श्रीकांत पठारे यांच्यावतीने आयोजित सर्वरोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पारनेर प्रतिनिधी
डॉ श्रीकांत पठारे, ओंकार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्यावतीने सुरू असलेल्या सर्वरोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सोमवारी जाधववाडी येथे झालेल्या शिबिरात १०५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
डॉ श्रीकांत पठारे व त्यांचे मित्रपरिवार तसेच ओंकार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पारनेर यांच्यावतीने सध्या पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार गटातील सर्व गावांमध्ये मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांना तालुक्यातील रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी जाधववाडी येथे झालेल्या शिबिरास १०५ रुग्णांनी लाभ व उपचार घेतले. डोंगरदऱ्यात असणाऱ्या छोट्याश्या गावात देखील मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून गावातील जवळपास सर्वच नागरिकांना या शिबिराचा लाभ भेटल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.यावेळी सरपंच विठ्ठल जाधव,उपसरपंच उषाताई जाधव, ग्रा प सदस्य वैभव जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष बन्सी महाराज जाधव, माजी उपसरपंच अलकताई जाधव, माजी सरपंच साळूबाई जाधव, श्रीधर जाधव, भिमाजी जाधव, शिवाजी जाधव, शंकर जाधव, सगाजी जाधव, अनिता जाधव, अविनाश जाधव, स्वप्नील जाधव, स्वप्नील सोमवंशी, वन कमिटी अध्यक्ष सखाराम जाधव,रावसाहेब जाधव, ज्ञानदेव जाधव, गमाजी सोमवंशी, नाथा जाधव, सुदाम जाधव, सोसायटी चेअरमन पांडुरंग सोमवंशी, नामदेव जाधव, माजी सरपंच संतोष जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
डॉ श्रीकांत पठारे यांच्या वतीने आयोजित केलेले शिबीर कान्हूर पठार गटातील सर्व गावांत होणार आहे. त्यामध्ये अनुक्रमे अक्कलवाडी, पाडळी दर्या, जाधववाडी, बाबुळवाडे, राऊत वाडी, वेसदरे, वडझिरे, विरोधी, कान्हुर पठार, पुणेवाडि, करंदी, किन्हीं, बहिरोबा वाडी, पिंपळगाव, हत्तलखिंडी आदी गावांमध्ये शिबीर होणार असून जास्तीत जास्त रुग्णांनी सहभाग घ्यावा असे आवाहन डॉ श्रीकांत पठारे व डॉ पद्मजा पठारे यांनी केले आहे. शिबिरासाठी डॉ श्रीकांत पठारे 9226129131, डॉ पद्मजा पठारे 9422756749, प्रमोद पठारे 9763860486, प्रशांत निंबाळकर 8600082287 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments