डॉ श्रीकांत पठारे वाढदिवस विशेष लेख ; विविध मान्यवर, नागरिक यांच्या बोलक्या प्रतिक्रिया...



वाढदिवस विशेष लेख : शब्दांकन चंद्रकांत कदम ९४२०४६३९२८


        १९ डिसेंबर हा डॉ श्रीकांत पठारे यांचा जन्मदिवस. लहानपणापासून समासेवेचा ध्यास घेतलेल्या या तरुणाने महाविद्यालयीन शिक्षणापासून युवकांचे संघटन करून त्यांना मदत करण्यास सुरुवात केली. विद्यार्थी दशेत असताना पुणे येथे वैद्यकीय शिक्षण घेत असताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नसाठी अनेकदा रस्ता रोको आंदोलन केले. डॉ शंकरराव भोई यांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांनी कै. पंढरीनाथ गोपाळराव पठारे स्मृती प्रतिष्ठान स्थापन करून  हजारो गोरगरीब विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च भागविला. व ते आजही कै. पंढरीनाथ गोपाळराव पठारे स्मृती प्रतिष्ठान व डॉ श्रीकांत पठारे सोशल फौडेशनच्या मध्यानातून समाजातील गोरगरीब व गरजूंना मदत करत आहे. त्यांच्या या समासेवेबद्दल त्यांच्या मूळ वडुले गावात त्यांना बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य करण्यात आले. त्यांचे पारनेर येथे प्रशस्थ व सर्वसोयीनयुक्त ओंकार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ श्रीकांत पठारे व त्यांच्या पत्नी डॉ पद्मजा पठारे यांनी लाखो रुग्णांवर अल्पदरात उपचार केले आहेत. आजही हक्काचा व कमी खर्चात उपचाराची हमी देणारा एकमेव डॉक्टर म्हणून डॉ श्रीकांत पठारे यांची जिल्ह्याभरात चर्चा आहे.


      २०१७ मध्ये प्रथम पंचायत समिती निवडणूक लढवून जवळा गणात सर्वाधिक मतांनी डॉ श्रीकांत पठारे यांनी विजय मिळविला. जवळा गणातील जनतेसोबतच तालुक्यातील सर्वच गावांतील जनतेच्या पारनेर तालुका स्तरावरील प्रशासकीय, वैद्यकीय व वैयक्तिक अडचणी सोडविण्यासाठी डॉ पठारे हे नेहमी अग्रेसर असतात. विधानसभेचे माजी उपाध्यक्ष ना. विजयराव औटी, जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते सर, पंचायत समिती सभापती गणेश शेळके यांच्या मध्यानातून जवळा गणातील गावांत विकासकामांचा डोंगर उभा करून गावांचा चेहरामोहरा बद्दलण्यामागे डॉ श्रीकांत पठारे यांचा मोठा वाटा आहे.

       कोव्हीडच्या पहिल्या लाटेत शिवसेना पक्षातर्फे पारनेर तालुक्यात कोव्हीड सेंटर सुरू करणारे शिवसेना हा देशातील पहिला पक्ष असून त्यामध्ये रुग्णांना मोफत उपचार करणारे डॉ श्रीकांत पठारे हे राज्यातील एकमेव डॉक्टर आहेत. पहिल्या लाटेत डॉ पठारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुमारे २५०० रुगांना उपचार करून बरे केले. कोव्हीडच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा पुढाकार घेऊन डॉ श्रीकांत पठारे यांनी पारनेर येथे "पूर्णवाद भवन" मध्ये प्रथम १०० बेडचे ऑक्सिजनयुक्त कोव्हीड सेंटर सुरू केले. नंतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या लोकवर्गणीतून २०० ते २५० रुग्ण क्षमतेचे  अद्ययावत कोव्हीड सेंटर सुरू केले. या कोव्हिडिसेंटरच्या माध्यमातून जवळपास ३५०० अतिसीरियस कोव्हीड रुग्णांवर उपचार केले. कोरोना रुग्णांनवर उपचार करताना २ वेळेस कोरोनाची लागण डॉ श्रीकांत पठारे यांना झाली होती. त्यांना आरामाची गरज असताना देखील "माझी मायबाप जनता, मृत्यूच्या दाढेत असताना मी कसा अराम करू शकतो" असे म्हणत ते पुन्हा कोव्हीड रुग्णांच्या सेवेत दाखल झाले होते. स्वतःचा खासगी दवाखाना असताना देखील कोव्हीड रुग्णांवर मोफत उपचार करणारे डॉ श्रीकांत पठारे हे राज्यातील एकमेव डॉक्टर आहेत असे गौरवोद्गार राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, खासदार डॉ सुजय विखे आदींसह राज्यभरातील विविध स्तरांतून डॉ पठारे यांच्या कामाचे कौतुक होत आहे. सध्या पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार जिल्हा परिषद गटातील सुमारे २८ गावांमध्ये आतापर्यंत मोफत सर्वरोगनिदान शिबीर व औषधोपचार शिबीर घेण्यात आले होते यामध्ये सुमारे ४२०० रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. दरवर्षी ओंकार हॉस्पिटल च्या मध्यमातून रुग्णांना डॉ श्रीकांत पठारे यांच्या माध्यमातून मोफत सर्वरोगनिदान शिबीर घेण्यात येत आहे. यांना डॉ श्रीकांत पठारे मित्रपरिवार पारनेर तालुका यांच्यावतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त जिल्ह्याभरातून विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यातील काही निवडक वाचनीय प्रतिक्रिया आपल्या सर्वांसाठी....


डॉ श्रीकांत पठारे हे सामान्य लोकांची सेवा करणारा युवा जनसेवक - सभापती गणेश शेळके

तळागाळातील सर्वांपर्यंत मोफत आरोग्य सेवा पुरविण्यासाठी डॉ श्रीकांत पठारे हे अहोरात्र झटत आहेत. कोरोना काळात त्यांचे आरोग्यसेवा सर्वश्रुत असून सामान्य लोकांची सेवा करणारे ते "युवा जनसेवक" असल्याची प्रतिक्रिया पारनेर पंचायत समिती सभापती गणेश शेळके यांनी व्यक्त केली.


उच्चविभूषित सर्वसामान्य लोकांची जाण असणारा कोरोना योद्धा - राहुल पाटील शिंदे

   वैद्यकीय सेवेत B.A.M.S करून पारनेर शहरात मध्यवर्ती ठिकाणी ओंकार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्या माध्यमातून व कोव्हीड काळात कोव्हीड सेंटरच्या माध्यमातून रुग्णांची निस्वार्थी सेवा डॉ श्रीकांत पठारे यांनी केली आहे. ते उच्च विभूषित असून सामान्य लोकांची जाण असणारा कोरोना योद्धा असल्याची प्रतिक्रिया अण्णा हजारे युवा मंचाचे अध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांनी व्यक्त केली.


प्रचंड वेगाने कामाचा ध्यास घेतलेला मी पाहिलेला "पहिला" शिवसैनिक - रामदास भोसले

सर्वसामान्य जनतेचे काम असो व वैद्यकीय सेवेतील काम असो, डॉ पठारे यांच्याकडे ते काम आले की प्रचंड वेगाने ते काम मार्गी लावण्यासाठी डॉ श्रीकांत पठारे हे तत्पर असतात. डॉ पठारे यांच्याकडे काम घेऊन आलेला माणूस काम मार्गी लावूनच माघारी जातो. प्रचंड वेगाने काम करण्याचा ध्यास असणारा पहिला शिवसैनिक डॉ. श्रीकांत पठारे यांच्या रूपाने पहिला आहे.


कोरोना काळात अनेकांचा जीव सच्चा योद्धा - विकास रोहोकले

कोरोना काळात कोरोना रुग्णांची रक्तातल्या नात्यातील नातलगांनी साथ सोडली होती. त्याकाळात रुग्णांना वैद्यकीय सेवेखेरीज मानसिक आधार डॉ श्रीकांत पठारे यांनी दिला. अनेकांचे जीव वाचवणारे डॉ पठारे हे सच्चे कोरोना योद्धे असल्याची प्रतिक्रिया शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांनी दिली.


गोरगरिबांसाठी सदैव तत्पर असणारा बाळासाहेबांचा निष्ठावान शिवसैनिक - भाऊ कोरगावकर

डॉ श्रीकांत पठारे हे वैद्यकीय सेवेबरोबरच समाजसेवेत नेहमी अग्रेसर राहणारे व्यक्तिमत्व आहे. समाजसेवा करत असताना कुठलीही आशा अपेक्षा न ठेवता काम करणारे डॉ श्रीकांत पठारे हे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक असल्याची प्रतिक्रिया शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांनी दिली.


डॉ पठारेंच्या समाजीज कामाबद्दल आम्हा नातेवाईकांना अभिमान - माजी आमदार दादाभाऊ कळमकर

  डॉ श्रीकांत पठारे हे सामाजिक काम करत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजसेवा करत आहेत. त्यांच्या याच समाजसेवेची राज्यभर चर्चा आहे. यामुळे आम्हा नातेवाईकांना डॉ पठारे यांचा अभिमान असल्याचे मत माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी व्यक्त केले.


डॉ पठारे तरुणांचे आयडॉल - अभिषेक कळमकर

डॉ पठारे यांच्या सामाजिक कामांमुळे त्यांची समाजात क्रेज वाढत आहे. तरुणांचे मोठे संघटन त्यांनी केले असून त्यांची कामाची तरुण प्रेरणा घेत आहेत. ते तरुणांचे "आयडॉल" असल्याचे मत अहमदनगर महापालिकेचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी व्यक्त केले.

 

जवळा गणातील कोहिनुर हिरा - बबन पाटील सालके

सर्व लोकांमध्ये मिळून मिसळून सर्वांचे अडीअडचणी दुःख समजून घेऊन सर्वांना विश्वासात घेऊन काम करणारा आमचे नेतावाईक डॉ श्रीकांत पठारे आहे. ते आमच्या जवळा पंचायत समिती गणासाठी लाभलेला "कोहिनुर हिरा" असल्याचे मत जवळे येथील सामाजिक कार्यकर्ते बबन पाटील सालके यांनी व्यक्त केले.


कोरोनाकाळात डॉ पठारेंमुळे वाचले "आमचे प्राण" - नागरिकांच्या प्रतिक्रिया

कोरोनाची लागण झाल्यानंतर सरकारी दवाखान्यात बेड शिल्लक नव्हते. आशा वेळी खासगी दवाखान्यात उपचारासाठी लागणारे 2,3 लाख रुपये खर्च करण्याची आमची परिस्थिती नव्हती.आशा काळात डॉ श्रीकांत पठारे अगदी देवदूतासारखे धावून आले. कोव्हीड सेंटरच्या माध्यमातून त्यांनी मोफत उपचार केल्यामुळे आमचे व आमच्या नातेवाईकांचे प्राण वाचले. तालुक्यातील तीन - साडे तीन हजार रुग्णांचे प्राण वाचविणारे डॉ श्रीकांत पठारे हे आमच्यासाठी देवपेक्षाही कमी नाहीत अशी प्रतिक्रिया कोरोनाची लागण होऊन बरे झालेल्या  रुग्णांनी व त्यांचे नातेवाईकांनी दिली.

Post a Comment

0 Comments