पारनेर तालुक्यातील जवळे येथे डॉ श्रीकांत पठारे यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न
पारनेर प्रतिनिधी
पारनेरकरांनी यापुढील काळात शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे साहेबांना अभिप्रेत काम करणाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे गरजेचे असून राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांना अजिबात साथ देता कामा नये. डॉ श्रीकांत पठारे यांच्यासारख्या माणसाच्या मागे भक्कमपने पाठीशी उभे राहा असे आवाहन शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी केले. पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, जिल्हा परिषद कृषी व बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दाते, पारनेर पंचायत समिती सभापती गणेश शेळके, माजी नगराध्यक्ष शंकरराव नगरे, शिवसेना महिला आघाडी प्रमुख प्रियांका खिलारी, माजी सहकार आयुक्त अशोकराव शेळके, राळेगण थेरपाळ चे सरपंच पंकजदादा कारखीले, आळकुटीच्या सरपंच कोमल भंडारी, कोहोकडी सरपंच डॉ साहेबराव पाणगे, अण्णा हजारे युवा मंचाचे अध्यक्ष राहुल पाटील शिंदे, निघोजचे सरपंच सचिन पाटील वराळ आदींसह पारनेर तालुक्यातील अनेक गावांतील सरपंच, उपसरपंच, सेवा संस्थेचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर म्हणाले की, डॉ श्रीकांत पठारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डॉ पाठरेंवर प्रेम करणारा मित्रपरिवाराची अलोट गर्दी पाहून मी भारावून गेलो. डॉक्टरांच्या वाढदिवसाला येण्याचे मला भाग्य लाभल्याचे कोरगावकर म्हणाले, डॉक्टर पठारेंनी कोरोनाच्या पहिल्या लाटेत शिवसेनेच्या वतीने सुरू केलेल्या कोव्हीड सेंटरमध्ये डॉक्टर पती-पत्नीने रुग्णांना सेवा दिली. आणि दुसऱ्या लाटेत देखील सुमारे साडेचार हजार रुग्णांना जीवदान दिल्याने डॉक्टरांच्यावर समाजाची निष्ठा वाढली असून आता त्यांची जबाबदारी देखील वाढली आहे. त्यांनी शिवसेना पक्षवाढीचे काम केले असून भविष्यात राज्यातील शिवसैनिकांची काळजी देखील डॉक्टर तुम्हालाच घ्यावी लागेल, असेही भाऊ करोगावकर म्हणाले. जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दाते म्हणाले की, आजच्या वाढदिवसाची उच्चांकी गर्दी बघता डॉ. श्रीकांत पठारे यांच्यासाठी ही भविष्यातील नांदी असणार आहे. पारनेर तालुक्यातील अनेक क्रांत्या या जवळे गावातून झाल्या असून डॉ पठारेंची क्रांतीला देखील जवळे मधूनच सुरुवात झाली असल्याचे दाते म्हणाले. शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले म्हणाले की, पायाला भिंगरी बांधल्यासारखी जनतेच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी डॉ श्रीकांत पाठरे हे प्रचंड वेगाने अहोरात्र काम करत आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी डॉ पद्मजा पठारे देखील खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यांच्या याच प्रेमापोटी हजारोंचा जनसमुदाय या अभिष्टचिंतन कार्यक्रमाला उपस्थित आहे. माजी नगराध्यक्ष शंकरराव नगरे म्हणाले की, स्वतःचा खासगी दवाखाना असताना देखील कोव्हीड सेंटरच्या मध्यामातून कोव्हिड रुग्णांवर मोफत उपचार करणारे डॉ श्रीकांत पठारे व कुटुंबीय हे राज्यातील एकमेव डॉक्टर आहेत. समाजकारण आणि वैद्यकीय सेवेची योग्य सांगड घालून ते समाजकारण करत असल्याने त्यांना राजकीय भवितव्य उज्वल आहे.
जवळे मित्रपरीवाराच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे जोरदार आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८ ते ११ मोफत सर्वरोगनिदान शिबीर व मोफत नेत्रतापासनी शिबीर आयोजित करण्यात आले होते. सायंकाळी नागरिकांच्या मनोरंजनासाठी "तुमच्यासाठी काय पण" या लोकसंगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉ श्रीकांत पठारे यांच्यावर प्रेम करणाऱ्या पारनेर तालुक्यातील मित्रपरिवाराच्या वतीने पारनेर ते जवळा मोटारसायकल रॅली काढली होती. तालुक्यातील अनेक गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवा संस्थेचे संचालक, सामाजिक कार्यकर्ते व मित्रपरिवाराच्या वतीने डॉक्टर श्रीकांत पठारे यांचा सन्मान व अभिष्टचिंतन करण्यात आले. कार्यक्रमावेळी सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले.
१० हजारांचा जनसमुदाय
डॉ श्रीकांत पठारे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला तालुक्यासह परिसरातून सुमारे १० हजारांपेक्षा जास्त मित्रपरीवार व जनसमुदाय उपस्थित होता. एवढा मोठा उपस्थित जनसमुदाय कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. जनसमुदयाबद्दल जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी देखील कौतुक केले.
अन गाण्यावर धरला सर्वांनी ठेका ....!
मनोरंजनासाठी आयोजित लोकसंगीत कलावंतांनी "श्रीकांत अण्णा पठारे डॉक्टर, तुम्ही एकच नंबर" हे गाणे गायल्यानंतर उपस्थित जनसमुदयाने त्या गाण्यावर ठेका धरला. या गाण्यासाठी तब्बल ५ वेळा "वन्स-मोअर" घेण्यात आला. या गाण्यासाठी उपस्थितांनी कलावंतांवर अक्षरशः पैशांची उधळण केली.
अन डॉ पठारे झाले भावुक....!
अभिष्टचिंतन सोहळ्याला अनपेक्षितपणे एवढा मोठा जनसमुदाय उपस्थित असलेला पाहून डॉक्टर पठारे काही काळ निषब्ध राहिले. ते भावुक होऊन शेवटी एवढेच म्हणाले की, एवढा जनसमुदाय पाहून मी आजपर्यंत करत असलेल्या सामाजिक कामाचे सार्थक झाल्याचे वाटत असून माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत मी तुमच्या सर्वांच्या सेवेत नम्रपणे राहणार असल्याचे डॉ श्रीकांत पठारे म्हणाले, यावेळी नकळत अश्रू गालावर ओघळले. त्यावेळी ते अश्रूंना आवर घालू शकले नाहीत.
0 Comments