शिवसेना सोशल मीडिया गणप्रमुख पदी आदिनाथ कदम यांची निवड

 

पारनेर प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील शिवसेना संघटनेत मोठाले फेरबदल सध्या पहावयास मिळत असून शिवसेना सोशल मीडिया जवळा गणप्रमुख पदी पिंपरी जलसेन येथील आदिनाथ संतोष कदम यांची निवड करण्यात आली आहे.


       आदिनाथ कदम हे सध्या पिंपरी जलसेन येथील शिवसेना उपशाखाप्रमुख म्हणून काम पाहत आहेत. सध्या पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे यांच्या सोबत कोव्हीड काळात कोरोनाग्रस्तांची सेवा करण्यासाठी आदिनाथ कदम यांचा नेहमी पुढाकार आहे. त्यांचे पक्षाविषयी असणारी तळमळ व संघटन वाढीसाठी असणारे योगदान याचा विचार करून शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांनी आदिनाथ कदम यांची शिवसेना सोशल मीडिया गणप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र तालुकाप्रमुख विकास रोहोकले, पारनेर नगरपंचायत माजी उपनगराध्यक्ष अनिकेतदादा औटी, शिवसेना तालुका संघटक अमोल गजरे यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले.

      या निवडीबद्दल पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे, कान्हूर पठार गटप्रमुख मंगेश सालके, गंजीभोयरे ग्रामपंचायत सदस्य राहुल तामखडे, डी के पांढरे पाटील, पिंप्री जलसेनमधील शिवसैनिक तसेच कान्हूर पठार जिल्हा परिषद गटातील शिवसैनिक व पदाधिकारी यांनी आदिनाथ कदम यांचे अभिनंदन केले..


Post a Comment

0 Comments