डॉक्टर श्रीकांत पठारे यांच्या वतीने आयोजित गांजीभोयरे येथील सर्व रोग निदान शिबिरात १९० रुग्णांचा सहभाग

 डॉ पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील गावांमध्ये मोफत सर्व रोग निदान शिबीर

पारनेर / प्रतिनिधी

पारनेर पंचायत समिती सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे यांच्या वतीने सध्या तालुक्यातील गावांमध्ये मोफत सर्वरोग निदान शिबीर व मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. आज गुरुवारी गांजीभोयरे येथे झालेल्या शिबिरात 190 रुग्णांनी सहभाग घेतला.


        डॉक्टर श्रीकांत पठारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेल्या पंधरा दिवसांपासून पारनेर तालुक्यातील कानूर पठार जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये डॉ पठारे व सहकार यांच्या वतीने मोफत सर्वरोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. आज गुरुवार दिनांक 16 डिसेंबर रोजी गांजीभोयरे येथे शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये गांजीभोयरे गावातील 190 रुग्णांनी तपासणी करून उपचार घेतले.


आज गांजीभोयरे गावामध्ये डॉक्टर श्रीकांत पठारे यांच्या माध्यमातून मोफत सर्वरोग निदान शिबिर उद्घाटन गांजीभोयरे गावचे विद्यमान सरपंच सौ आनिताताई नारायण बाचकर, सेवा संस्थेचे माजी चेअरमन विठ्ठल तुळशीराम खोडदे, तसेच गांजीभोयरे गावचे विद्यमान उपसरपंच  आनंदराव झंजाड  तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहुलशेठ तामखडे पाटील,  बाळासाहेब पांढरे, युवा नेते डिके पांढरे पाटील,   माजी उपसरपंच राजेंद्र पांढरे, दत्ताराजे निंबाळकर ,तसेच गांजीभोयरे गावातील नागरिक उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments