डॉ श्रीकांत पठारे यांच्यावतीने आयोजित सर्वरोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पारनेर प्रतिनिधी
डॉ श्रीकांत पठारे, ओंकार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्यावतीने सुरू असलेल्या सर्वरोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून बुधवारी सांगवी सुर्या येथे झालेल्या शिबिरात १७८ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
डॉ श्रीकांत पठारे व त्यांचे मित्रपरिवार तसेच ओंकार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पारनेर यांच्यावतीने सध्या पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार गटातील सर्व गावांमध्ये मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांना तालुक्यातील रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बुधवारी येथे झालेल्या शिबिरास १७८ रुग्णांनी लाभ व उपचार घेतले. सर्वरोग निदान शिबिरासोबत मोफत डोळ्यांची तपासणी करण्यात आली. ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल अशांना अत्यल्प दरात डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
सांगवी सुर्या येथे शिबिरास ह.भ.प लक्ष्मण महाराज कोठावळे, उपसरपंच शरद कोठवळे, सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ कोठावळे, डॉ चंद्रकांत कोठावळे, मोहन पाटील, रामभाऊ कोठावळे,कोंडीभाऊ आढाव, वामन म्हस्के, विठ्ठल कोठावळे, अंकुश आढाव, प्रमोद आढाव, भागचंद इरोळे, लालाजी झंझाड, माजी सरपंच संदीप रासकर,आनंदा रासकर, भास्कर आढाव, दादाभाऊ साळवे, भाऊसाहेब झंझाड, नामदेव झंझाड व संगविसूर्या मधील ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते.
या शिबिरात डॉ श्रीकांत पठारे, डॉ पद्मजा पठारे यांनी रुग्णांची तपासणी केली. व प्रशांत निंबाळकर, संकेत साठे, सागर कासार, शीतल चत्तर आदींनी रुग्णांना औषधोपचार दिले.
0 Comments