शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पारनेर प्रतिनिधी
पारनेर पंचायत समिती सदस्य डॉक्टर. श्रीकांत पठारे व ओंकार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पारनेर यांच्या वतीने सुरू असलेल्या सर्व रोग निदान शिबिरला तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. डॉक्टर पठारे यांच्या स्वतःच्या वडुले गावात सर्वरोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
वडुले येथील शिबिरात गावातील नागरिकांचे मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. रुग्णांच्या इतर तपासण्या करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले. यावेळी सरपंच आशाताई भापकर, उपसरपंच विष्णू कंद, पानोली सरपंच शिवाजी शिंदे, डॉ. निता पठारे, जया पठारे , कचरू भापकर , बाळासाहेब निमोनकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी गावातील सुमारे १५५ रुग्णांनी शिबिरात सहभाग घेतला.
शिबिराच्या यशस्वितेसाठी डॉक्टर श्रीकांत पठारे, डॉ पद्मजा पठारे, प्रमोद पठारे, प्रशांत निंबाळकर, संकेत साठे, शितल चत्तर, आदींसह ओंकार हॉस्पिटल मधील इतर स्टापने सहकार्य केले.
वडुल्याच्या शिबिरात डॉ पठारे बंधूंकडून रुग्णांची सेवा
वडुले येथील शिबिरात डॉक्टर श्रीकांत पठारे त्यांच्या पत्नी डॉक्टर पद्मजा पठारे व मोठे बंधू डॉ बाळासाहेब पठारे यांच्या पत्नी डॉ नीता पठारे यांनी शिबिरात रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले.
0 Comments