शिवसेना पारनेर तालुका संघटकपदी अमोल गजरे यांची निवड

 पारनेर प्रतिनिधी

पारनेर तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली असून पारनेर शिवसेना तालुका संघटक पदी देवीभोयरे येथील शिवसेना शाखाप्रमुख अमोल गजरे यांची निवड करण्यात आली आहे. 


       शिवसेनेच्या शाखाप्रमुख पदी अनेक वर्षे काम करून शिवसेना ग्रामीण भागात वाढवण्याखेरीज सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत शिवसेनेचे विचार व कामे अमोल गजरे यांनी पोहोचवली आहे. शिवसैनिक, शाखाप्रमुख आदींच्या माध्यमातून समाजातील सर्वसामान्य जनतेच्या वैयक्तिक व प्रशासकीय कामे तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डॉ श्रीकांत पठारे यांच्यासोबत कोव्हीड रुग्णांची सेवा अमोल गजरे यांनी केली. कोव्हीड रुग्णांची सेवा करताना त्यांना कोरोनाची लागण देखील झालीहोटी. कोरोनातून बरे झाल्यानंतर ते पुन्हा डॉ पठारे यांच्यासोबत कोरोना रुग्णांच्या सेवेत दाखल झाले होते. त्यांच्या या सामाजिक कामांची दखल घेऊन शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर व विधानसभेचे माजी उपाध्यक्ष ना. विजयराव औटी यांच्या सुचनेने शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांनी अमोल गजरे यांची शिवसेना पारनेर तालुका संघटक पदी नियुक्ती केली.  शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दाते सर, पारनेर पंचायत समिती सभापती गणेश शेळके, पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांच्या हस्ते युवासेना उपतालुकप्रमुख अमोल ठुबे, दत्ता गाडगे सर,विश्वनाथ गाजरे, अरुण गजरे सर,संतोष केदारी, अक्षय बेलोटे, संजय बेलोटे, शरद बोरुडे, भाऊसाहेब सरडे, वृषाल ठुबे  आदींच्या उपस्थितीत अमोल गजरे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

शिवसेनेला बळकटी येणार...

 शिवसेना तालुका संघटक म्हणून अमोल गजरे यांच्या रूपाने एक उमदा चेहरा शिवसेनेला मिळाला आहे. गजरे यांचा तालुक्यातील संपर्क, युवकांचे व शिवसैनिकांचे असणारे संघटन याचा फायदा शिवसेनेला येत्या पंचायत समिती - जिल्हा परिषद निवडणुकीत  होणार असल्याचे दिसून येत आहे. अमोल गजरे यांच्या मुळे शिवसेनेला बळकटी मिळणार आहे.


सर्वसामान्य शिवसैनिकाच्या निष्ठेला शिवसेनाच न्याय देऊ शकते - अमोल गजरे

निस्वार्थीपणे संघटनेसाठी काम करणारे व शिवसेना पक्षवढीसाठी काम करणाऱ्या शिवसैनिकांना शिवसेनेत न्याय मिळतो. माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाला तालुका संघटक म्हणून निवड करून मी शिवसेनेसाठी केलेल्या निस्वार्थी कामाची मला पावती मिळाली आहे. यापुढील काळात तालुक्यात शिवसेनेचे संघटन वाढविण्यावर भर देणार असून तालुक्यात शिवसेनेची ताकद आणखी वाढवणार असल्याचे मत नवनियुक्त शिवसेना तालुका संघटक अमोल गजरे यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments