पारनेर प्रतिनिधी
शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथे डॉक्टर श्रीकांत पठारे यांच्या वतीने मोफत सर्वरोग निदान शिबीर व मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे २०० रुग्णांनी सहभाग घेतला.
डॉक्टर श्रीकांत पठारे व मित्रपरिवार तसेच ओंकार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पारनेर यांच्यावतीने पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार जिल्हा परिषद गटांमधील सर्व गावांमध्ये मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत जवळपास अठरा गावांमध्ये शिबिर संपन्न झाले आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पिंपरि जलसेन येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात अस्थीरोग, स्त्रीरोग, हृदय रोग, कान नाक घसा, पोटाचे आजार आदींच्या तपासण्या करून औषधोपचार करण्यात आले. तसेच डॉक्टर डोळे फाउंडेशन च्या वतीने मोफत डोळ्यांची तपासणी करण्यात आली व अल्प दरामध्ये शस्त्रक्रिया साठी पाठविण्यात आले. या शिबिरात सुमारे दोनशे रुग्णांनी उपचार घेतले.
यावेळी सरपंच सुरेश काळे, उपसरपंच भाऊसाहेब पानमंद, ग्रामपंचायत सदस्य सचिन शेळके, अभिमन्यू थोरात, संतोष थोरात, अश्विनी रणदिवे, सीताबाई कदम, बबन घेमुड, साहेबराव थोरात, ज्ञानदेव वाढवणे, भास्कर थोरात, दगडू थोरात, बी एल थोरात, विठ्ठल काळे, बाळासाहेब वाढवणे, आप्पासाहेब कदम, शिवाजी बोरुडे, दगडू बोरुडे, अक्षय बोरूडे, प्रभू कदम, मच्छिंद्र कदम, सचिन काळे, अक्षय कदम, आदिनाथ कदम आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
शिबिरामध्ये पारनेर पंचायत समिती सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे, डॉक्टर पद्मजा पठारे, प्रशांत निंबाळकर, संकेत साठे, सागर कासार, शितल चत्तर आदींनी वैद्यकीय सेवा दिली.
भोसले यांचा वाढदिवस साजरा
शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यांचा वाढदिवस पिंपरि जलसेन ग्रामस्थांच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी पारनेर पंचायत समिती सभापती गणेश शेळके, नगराध्यक्ष शंकरराव नगरे, डॉक्टर श्रीकांत पठारे आदींच्या प्रमुख उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला.
0 Comments