जवळेतील शेतकऱ्यांना कुकडीचे मोफत पाणी ...! जवळे सहकारी सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम

 पारनेर प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील जवळे येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेकडून गावातील सर्व शेतकऱ्यांना कुकडीचे मोफत पाणी देण्यात येणार आहे .  सेवा संस्थेने तसा निर्णय घेतला आहे . संपुर्ण जवळे गावची  कुकडी प्रतकल्पातुन मिळणाऱ्या पाण्याची दोन लाख पासष्ट हजार रुपये पाणीपट्टी भरण्यात आली . 


यावेळी शेतकऱ्यांची सुमारे एक लाख रुपयांची थकीत पाणीपट्टी  ही भरण्यात आली आहे. सेवा संस्थेला झालेल्या नफ्यातुन  याबाबतच्या निधीची तरतुद करण्यात आली आहे . जवळे गावाला एकुन सतराशे हक्टेर बागायती शेत जमीन आहे . त्यासाठी तीन पाणीवापर  सहकारी संस्था कार्यरत आहेत .   पाणी वापर संस्थांना  पाणीपट्टी  वसुलीबाबत  अडचणी येत असल्यामुळे  जवळे ग्रामस्थांनी हा घेतला आहे . त्यामुळे आता कुकडी आर्वतनाचे मुबलक पाणी मिळण्याला  अडचण  येणार नाही . चालु हंगामाची  आगावू पाणीपट्टीही  भरण्यात आली  आहे .

आता यापुढे गावची  पाणीपट्टी सेवा संस्थेकडून भरून शेतकऱ्यांना मोफत पाणी देण्यात येणार असल्याचा निर्णय घेतल्याचे स्थंस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव सालके यांनी सांगितले . असा निर्णय घेणारे जवळे हे कुकडी प्रकल्प लाभ क्षेत्रातील पहीलेच गाव असल्याचे  बबनराव सालके, किसनराव रासकर यांनी सांगितले ,तर या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मोठा दिलासा मिळेल असे प्रगतशिल शेतकरी संतोष पठारे यांनी सांगितले .

  कुकडी  डावा कालवा  पाणी संघर्ष समितीने याबाबत  सेवा संस्थेकडे मागणी केली होती . यावेळी  गोरख पठारे, बाबाजी लोखंडे , नवनाथ सालके , प्रदिप सोमवंशी , गोरख सालके , मंगेश सालके , बाळासाहेब सालके , संदिप सालके , नाथा रासकर , सुर्यकांत सालके , संपत आढाव , पांडूरंग कोठावळे , ज्ञानदेव पठारे , सतिष बरशिले , प्रभाकर पठारे वाल्मीक पठारे आदी उपस्थित होते .

ऐतिहासिक निर्णय ....!

जवळे  ग्रामस्थांनी घेतलेला हा निर्णय एक आर्दश असुन याचे अनुकरण  आता कुकडी लाभक्षेत्रातील इतर सर्व गावांनी करावे  . या प्रकल्पाचे  समन्यायी पाणीवाटपाची मागणी करताना  पाणीपट्टीचा हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे . म्हणून कुकडी कालवा पाणी संघर्ष समितिच्या वतीने   लाभक्षेत्रातील सर्व गावांना जवळे प्रमाणे निर्णय घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे .

- रामदास घावटे अध्यक्ष कुकडी कालवा संघर्ष समिती जवळे , ता पारनेर  

Post a Comment

0 Comments