पारनेरच्या शिवसेना मेळाव्यात डॉ श्रीकांत पठारेंची रॅली ठरले मुख्य आकर्षण



रॅलीतून डॉ पठारेंचे शक्तिप्रदर्शन

मंत्री ना. गडाखांकडून डॉ पठारेंचे कौतुक

चंद्रकांत कदम / पारनेर

     शनिवारी पारनेरमध्ये झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसैनिकांना मोठी ऊर्जा मिळाली. दोन वर्षात प्रथमच मेळावा झाला आणि त्याला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने शिवसेनेला पारनेर तालुक्यात नवसंजीवनी मिळाली आहे. या मेळाव्यावेळी कान्हूर पठार गटातील शिवसैनिकांनी पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढली होती. मेळाव्यात ही रॅली मुख्य आकर्षण ठरले. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर डॉ पठारे यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनाची चर्चा पारनेर तालुक्यात रंगली आहे.


        विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला पराभव मिळाल्यानंतर शिवसैनिक नाराज झाले होते. शिवसैनिकांमध्ये मरगळ आली होती. शनिवारी पारनेरमध्ये  जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात ना. गडाख व विधानसभेचे माजी उपाध्यक्ष ना. विजयराव औटी यांनी केलेल्या चौफेर फटकेबाजीने व शिवसैनिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचे शब्द ना. गडाख व औटींनी दिल्याने शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य आले आहे. येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत याचा फायदा शिवसेनेला होणार आहे.या मेळाव्यावेळी कान्हूर पठार जिल्हा परिषद गटातील शिवसैनिकांनी पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्वाखाली ढोल ताशे, व मोटर सायकल रॅली काढली होती. ही रॅली शिवसेना मेळाव्याचे मुख्य आकर्षण ठरले. कार्यकर्त्यांचे संघटन, शिस्तबद्धता, आणि कार्यकर्ते जुळवण्याची हातोटी, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केलेले शक्तिप्रदर्शन व दिवसेंदिवस डॉ श्रीकांत पठारे यांची वाढत असलेली लोकप्रियता याबद्दल जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख यांनी पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांचे विशेष कौतुक केले.

       

कान्हूर पठार गट शिवसेनेचा बालेकिल्ला सिद्ध

पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्वाखाली कान्हूर पठार जिल्हा परिषद गटातील सर्व गावांतील शिवसैनिकांनी रॅलीचे आयोजन केले होते. यामध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत डॉ श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे देखील यावेळी शिवसैनिकांनी स्पष्ट केले. कान्हूर पठार गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून गटात शिवसेनेचे वर्चस्व असल्याचे शनिवारच्या कार्यक्रमातून पुन्हा एकदा सिद्ध झाले.


Post a Comment

0 Comments