चंद्रकांत कदम / पारनेर
गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून पारनेर तालुक्यात थंड झालेले शिवसेनेचे वादळ जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा पूर्ण जोमाने पेटून उठले आहे. शिवसेनेत इनकमिंग वाढले असून पारनेर तालुक्यातील पठारवाडी मध्ये माजी सरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनसह असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
पठारवाडी मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या अन्यायामुळे संपूर्ण नाराज गट शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये पठारवाडी गावचे माजी सरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, एक कुशल नेतृत्व, उत्तम संघटक, जबरदस्त वक्तृत्व शैली असणाऱ्या युवा नेता देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहे. नुकतेच जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत पारनेर येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात इतर पक्षांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मेळाव्यात शिवसैनिकांना ऊर्जा व प्रेरणा मिळाली असून सध्या शिवसेनेत इनकमिंग वाढले आहे. इतर पक्षांसह राष्ट्रवादीचे अनेक मोठाले नेते , कार्यकर्ते देखील शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. सध्या होणाऱ्या इनकमिंग चा फायदा येणाऱ्या नगर पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत होणार आहे.
कान्हूर पठार गटात शिवसेनेत इनकमिंग लक्षणीय
पारनेर तालुक्यातील पठारवाडी मध्ये माजी सरपंचासह, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, एक कुशल व उत्तम संघटन असणाऱ्या युवा नेत्यासह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे. त्याखेरीज यापूर्वी राजकीय दृष्टया महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या जवळा व कान्हूर पठार तसेच इतरही अनेक गावांतील येथील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. सध्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे त्यात कान्हूर पठार गटातील लक्षणीय प्रवेश आहे. कान्हूर पठार गटात शिवसेनेची ताकद वाढत असून त्याचा फायदा येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत होणार असल्याचे दिसून येत आहे.
ते सरपंच, सदस्य कार्यकर्ते कोण ...?
शिवसेनेत प्रवेश करणारे माजी सरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, युवा नेता, कार्यकर्ते कोण आहेत ? याबाबत पारनेर तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे... शिवसेनेव्यतिरिक्त इतर पक्षांनी प्रवेश करणारे नेमके आपल्या पक्षातील तरणहीत ना ? अशी चाचपणी करायला सुरुवात केली आहे....
0 Comments