लोणीमावळ्याचे ग्रामपंचायत सदस्य बाबुराव उर्फ भागूजी शेंडकर यांचे अपघाती निधन

 


पारनेर प्रतिनिधी

लोणीमावळा  येथील सामाजिक कार्यकर्ते, प्रगतशील शेतकरी व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बाबुराव उर्फ भागुजी धोंडीबा शेंडकर यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. माजी ग्रामपंचायत सदस्य विलास शेंडकर यांचे वडील व सोसायटी व्हाईस चेअरमन शहाजी शेंडकर यांचे चुलते होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. लोणीमावळा आणि पंचक्रोशी मध्ये त्यांचा मोठा नावलौकिक होता. मनमिळावू आणि अतिशय प्रेमळ स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा सर्वांना परिचय होता. त्यांचे अपघाती निधन झाल्याने लोणीमावळा व पंचक्रोशी मध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments