अण्णांनी उदघाटन केलेल्या वाडेगव्हान-राळेगण सिद्धी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे ; अधिकाऱ्यांची उत्तरे देण्यास टाळाटाळ पारनेर परिवर्तनची तक्रार

 


पारनेर : मागील महिन्यात जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी उदघाटन केलेल्या राळेगण सिद्धी ते वाडेगव्हान या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. वाडेगव्हान कुकडी कालव्याच्या मागे पूढे या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. परंतू पारनेर तालुक्याच्या ठेकेदारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा गलथान कारभार यातून उघड होत आहे. याबाबत पारनेर तालुका परिवर्तन फाउंडेशन तक्रार करणार आहे.

        राळेगण सिद्धी - वाडेगव्हान या रस्त्यावर जे काम चालू आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असून माती मिश्रित मुरूम वापरला जात आहे. त्या कामाची टेंडर प्रत मागितली असता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत असून पारनेर परिवर्तन टीम ने सां. बा विभागाचे अभियंता  तिकोळे  यांच्याशी संपर्क करून कामाच्या दर्जाबाबत विचारणा करुन कार्यस्थळावर येऊन काम कसे दर्जाचे होत आहे हे स्वतः पाहावे असे सांगितले. परंतू शब्द देऊनही अधिकारी त्या ठिकाणी आले नाहीत. परिवर्तन टीम ने या रस्त्याचे फोटो आणि व्हिडीओ घेऊन तक्रार दाखल करत आहोत असे जाहीर केले. हे काम संपूर्ण चुकीच्या पद्धतीने आणि माती मिश्रित मुरूम टाकून केले जात आहे. यात प्रचंड भ्रष्टाचार असून जर निकृष्ट दर्जाचे काम होणार असेल तर हे अशी कामे करण्यात काहीच अर्थ नाही अशी मागणी पारनेर तालुका परिवर्तन फाउंडेशन चे कार्याध्यक्ष सुहास शेळके यांनी केली आहे.


     निदान आदरणीय अण्णांच्या गावाला जोडणाऱ्या व सामाजिक कामाची पंढरी असणाऱ्या पवित्र गावाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामात तरी टक्केवारी आणि भ्रष्टाचार नको. आणि जर अधिकाऱ्यांना कामे नीट करता येत नसतील तर बदली करून घ्या, किंवा राजीनामे देऊन घरी बसा. अशी कडवी प्रतिक्रिया पारनेर परिवर्तनचे अध्यक्ष सचिन भालेकर यांनी दिली.


अन्यथा गुन्हे दाखल करू...

      पुढील आठवड्यात या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाबाबत जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांना भेटून या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या जातील असे परिवर्तनचे अध्यक्ष सचिन भालेकर यांनी सांगितले. तसेच या कामाची टेंडर प्रत माहिती अधिकारात मागवून परिवर्तन तर्फे संपूर्ण कामावर बारीक लक्ष ठेवले जाईल.  आणि जर टेंडर प्रमाणे काम झाले नाही तर याची बिले न काढू देता नागरिकांची फसवणूक केल्याचे गुन्हे ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर जरूर दाखल करू अशी भूमिका परिवर्तन ने घेतली आहे .

Post a Comment

0 Comments