फार्मसी विद्यार्थ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनाची राळेगण सिद्धीतून होणार सुरुवात

 


 नॅशनल फार्मासिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष सचिन भालेकर यांच्या नेतृत्वात होणार आंदोलन


चंद्रकांत कदम पारनेर

ड्रग इन्स्पेक्टर या पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतीच ८७ जगाची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. परंतु  त्यामध्ये  वर्ष अनुभवाची अट टाकलेली आहे.दिल्ली , हिमाचल प्रदेश ,तामिळनाडू ,राजस्थान , सिक्कीम इत्यादी राज्यांनी त्यांची ड्रग इन्स्पेक्टर पदाची अट शिथिल केली असल्याने महाराष्ट्रात ही अट तातडीने काढून टाकावी अन्यथा 30 नोव्हेंबर पासून जेष्ठ समासेवाक अण्णासाहेब हजारे यांचे आशीर्वाद घेऊन राळेगण सिद्धी पासून तीव्र आंदोलनाला सुरुवात करणार असल्याची माहिती नॅशनल फार्मासिस्ट असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सचिन भालेकर यांनी दिली आहे.


तसेच याच धरतीवर संघ लोकसेवा आयोग (upsc ) यांनी सुद्धा पदाची अनुभव अट काढून टाकलेली आहे. नुकतेच पदवी  फर्मसी झालेले बेरोजगार फार्मसिस्ट ची संख्या दीड लाखांपेक्षा जास्त आहे. विद्यार्थी रोजगाराच्या शोधत असतात मग ३ वर्ष अनुभव घेतलेले आर्थिक सक्षम लोकांना घेऊन काय साध्य  होणार आहे ? नियुक्तीसाठी अनुभवाची अट न ठेवता नियुक्तीनंतर प्रोबेशन आणि ट्रेनिंग ठेवले तरी सुद्धा त्या पदाला न्याय देणे शक्य होईल. या पार्श्वभूमीवर  सर्व पदवी फार्मसी विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची संधी द्यावी व आपल्या सेवा प्रवेश नियमामध्ये तातडीने बदल करावे. अन्यथा फार्मसी च्या विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. 

याच जाहिरातीच्या अनुषंगाने इतरही अनेक चूका झालेल्या आहेत जसे की, फार्म डी या कोर्सला सरकारनेच मान्यता दिली आहे. आणि त्यांना मात्र या परीक्षेसाठी अर्जचं करता येत नाही. मुळात उत्पादन विभागाचे तपासण्या आता केंद्राचे निरीक्षक करत असताना राज्याचे निरीक्षकांना मात्र फकीर रिटेल आणि होलसेल मेडिकल तपासणीचे काम आहे. अश्या वेळी या अधिकाऱ्यांना जाचक अशी अनुभवाची अट लावणे संयुक्तिक वाटत नाही. कार्यभरानुसार अटी असाव्यात आणि कालानुरूप विद्यार्थी संख्या पाहून त्या प्रमाणात संधी उपलब्ध व्हाव्यात हीच विनंती.

तसेच रिसर्च अँड डेव्हलपमेंट च्या विद्यार्थ्यांना मात्र डावलले जाते ,वास्तविक पाहता रिसर्च हा गाभा असतो. आणि या अनुभवाच्या अटीमुळे अनेक हुशार विद्यार्थी या संधीपासून वंचित राहत असल्याचे मत सचिन भालेकर यांनी व्यक्त केले आहे.


महाराष्ट्रात फार्मसी कॉलेजेस ची संख्या ही भरमसाठ झाली आहे. आणि त्या प्रमाणात उत्पादनाचा अनुभव घेण्यासाठी कंपन्या उपलब्ध नाहीत. आणि ज्या आहेत त्यात जागा नाहीत. मग एक बाजूला भरमसाठ कॉलेज ला मान्यता द्यायची आणि दुसऱ्या बाजूला मात्र विद्यार्थ्यांसाठी उतपादन कंपनी उपलब्ध नाहीत.  आणि शासनाने मात्र भरती वेळी अनुभवाची आणि तीही ३ वर्ष अट लावायची हे संपूर्णतः अन्याकरक आहे. महाराष्ट्रात फार्मसी कॉलेजेस ची संख्या आहे ४०० पेक्षा जास्त आणि यातून दर वर्षी पास होणारे विद्यार्थी आहेत २४००० पेक्षा जास्त ,फार्म डी आणि पोस्ट ग्रॅज्युएट होणारे मिळून झाले ३०००० प्रश्न हा आहे. इतक्या विद्यार्थ्यांना सामावून घेण्याची क्षमता संपूर्ण देशातील फार्मा  इंडस्ट्री मध्ये नाही. मग हि अनुभवाची अट  पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी कुठे जावे असा सवाल देखील सचिन भालेकर यांनी उपस्थित केला आहे.


पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर प्राधान्य असे जाहिरातीत म्हटले आहे. हे हास्यास्पद आहे, म्हणजे २ वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे. त्यानंतर ३ वर्ष काम करायचे आणि मग परीक्षा द्यायची, म्हणजे शासनाला नेमके काय हवे आहे.पास होणार ३०००० आणि नोकरी मात्र फक्त ३०० ते ४०० जणांना मिळणार,मग बाकीच्यांनी अनुभव आणायचा कुठून हा नैसर्गिक न्याय होत नाही.यात अनेक पीएच डी  चे हुशार विद्यार्थी संधिस मूकतील काळानुसार कायदे बदलायला हवे. शासनाने तातडीने निर्णय घेऊन या परीक्षाना स्थगिती द्यावी. आणि नव्याने जाहिरात द्यावी असे न झालेस राज्यभर फार्मासिस्ट संघटना तीव्र आंदोलन उभे करत आहोत. ३० नोव्हेंबर  पर्यंत याबाबत निर्णय न झाल्यास फार्मसी विद्यार्थी बचाव कृती समितीसमोर आमरण उपोषण हाच मार्ग राहील याची नोंद घ्यावी. असा इशारा देत याबाबत शासनाकडून दाखल घेतली जाईल अशी अपेक्षा अध्यक्ष सचिन भालेकर यांनी व्यक्त केली आहे.


"अनुभवाची अट म्हणजे भ्रष्टाचाराचे कुराण तयार करण्याची प्रक्रिया आहे. एम पी एस सी ने जाहिराती मध्ये उल्लेख केला आहे की, जर अर्ज कमी आले तर परीक्षा न घेता थेट मुलाखती घेऊन भरती करू. म्हणजेच अनुभवाची अट घातली की फॉर्म कमी होतील, आणि परीक्षा घ्यावी लागणार नाही. साहजिक या पदांचा बाजार होणार, म्हणजेच या सरकारने भ्रष्टाचाराची तरतूद करून ठेवल्याचे दिसते. याबाबत अण्णासाहेब हजारे यांची भेट घेऊन हा प्रकार निदर्शनास आणून देणार आहे.

 - सचिन भालेकर अध्यक्ष नॅशनल फार्मासिस्ट असोसिएशन"

Post a Comment

0 Comments