डॉ श्रीकांत पठारे यांच्या वतीने कान्हूर पठार गटात सर्व रोग निदान शिबीरास सुरुवात

 


गटातील प्रत्येक गावात होनार  आरोग्य तपासनी शिबीर 

पारनेर प्रतिनिधी

पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे  व त्यांच्या मित्रपरीवराच्या वतीने पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार गटातील सर्वच गावांमध्ये सर्वरोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले असून गुरुवार दि 25 नोव्हेंबर रोजी वडगाव दर्या येथून शिबिरास सुरुवात झाली आहे.


      डॉ श्रीकांत पठारे  व मित्रपारीवराच्या वतिने सर्व रोग निदान शिबीरास गुरुवार पासून सुरुवात झाली आहे. यामध्ये अस्थीरोग, स्त्रीरोग, हृदयरोग, मधुमेह, दमा, मूळव्याध, भगंदर, कान-नाक घसा यांचे विकार, पोटाचे विकार इत्यादी आजारांची तपासणी मोफत केली जाणार आहे. गुरुवार दि 25 नोव्हेंबर रोजी वडगाव दर्या येथून या शिबिरास प्रारंभ करण्यात आला आहे. यावेळी  डॉ श्रीकांत पठारे, डॉ पद्मजा पठारे, प्रमोद पठारे यांच्यासह ओंकार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पारनेरचे सर्व स्टाफ रुग्णांच्या उपचारासाठी प्रयत्नशील आहे. या शिबिरास वडगाव दर्या येथील अनेक रुग्णांनी सहभाग घेऊन उपचार करून घेतले. यावेळी वडगाव दर्या येथील सरपंच प्रवीण गावडे, शिवसेना शाखाप्रमुख मनोहर पारधी, राजेंद्र कांबळे, मोहन परांडे, पुष्पलता परांडे, युवासेना उपतालुकप्रमुख अमोल ठुबे, दार्यभाऊ पारधी, साधू गावडे, पांडुरंग गुंड, रंगनाथ गुंड, मुरलीधर गुंड, बाळकृष्ण परांडे, ग्रा प सदस्य शांताराम सोनवणे, चंद्रकांत गायकवाड, सुभाष साळवे, दिनकर परांडे आदींसह ग्रामस्थ व रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       डॉ श्रीकांत पठारे यांच्या वतीने आयोजित केलेले शिबीर कान्हूर पठार गटातील सर्व गावांत होणार आहे. त्यामध्ये अनुक्रमे अक्कलवाडी, पाडळी दर्या, जाधववाडी, बाबुळवाडे, राऊत वाडी, वेसदरे, वडझिरे, विरोधी, कान्हुर पठार, पुणेवाडि, करंदी, किन्हीं, बहिरोबा वाडी, पिंपळगाव, हत्तलखिंडी आदी गावांमध्ये शिबीर होणार असून जास्तीत जास्त रुग्णांनी सहभाग घ्यावा असे आवाहन डॉ श्रीकांत पठारे व डॉ पद्मजा पठारे यांनी केले आहे. शिबिरासाठी डॉ श्रीकांत पठारे 9226129131, डॉ पद्मजा पठारे 9422756749, प्रमोद पठारे 9763860486, प्रशांत निंबाळकर 8600082287 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments