पारनेर/प्रतिनिधी
पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे यांच्यावतीने सुरू असलेल्या सर्वरोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून तालुक्यातील मोठ्या संख्येने रुग्ण शिबिराचा लाभ घेत आहेत. समाजातील तळागाळातील जनतेला मोफत उपचार मिळावेत या उद्देशाने हे शिबीर सूर केले असून डॉ. श्रीकांत पठारे यांचे "हे" सामाजिक काम समाजासाठी आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार बाभूळवाडे गावचे सरपंच सौ वैशाली देवेंद्र जगदाळे यांनी काढले.
डॉ. श्रीकांत पठारे, ओंकार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पारनेर व मित्रपरिवाराच्या वतीने पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार गटातील सर्व गावांमध्ये भव्य मोफत सर्व रोगनिदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. रविवारी दिनांक २८ रोजी पारनेर तालुक्यातील बाभूळवाडे येथे शिबीर घेण्यात आले. यावेळी सरपंच वैशाली जगदाळे, डॉ सुरेश खनकर, उपसरपंच भाऊसाहेब नवले,गुलाब बापूराव नवले, सविता जगदाळे(ग्रा.प सदस्य), निशा खनकर(ग्रा. प सदस्य), प्रमोद खनकर(ग्रा.प सदस्य), विकास शिर्के, बारकू मंडलिक, धनंजय पोटघन, संपत जगदाळे, गणपत जगदाळे(तंटामुक्ती अध्यक्ष), चेरमन श्रीराम पवार, बाबुराव शिर्के, युवानेते निलेश कदम, युवानेते अमोल जगदाळे, वैभव जगदाळे, आनंदा मातेरे, भाऊसाहेब जगदाळे, संतोष बोरुडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी जवळपास दोनशे रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला.यावेळी डॉ श्रीकांत पठारे, डॉ पद्मजा पठारे, प्रमोद पठारे, प्रशांत निंबाळकर, पूनम खोडदे, पप्पू गाडेकर, संकेत साठे, शितल चत्तर यांच्यासह ओंकार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पारनेरचे सर्व स्टाफ रुग्णांच्या उपचारासाठी प्रयत्नशील आहे.
डॉ श्रीकांत पठारे यांच्या वतीने आयोजित केलेले शिबीर कान्हूर पठार गटातील सर्व गावांत होणार आहे. त्यामध्ये अनुक्रमे अक्कलवाडी, पाडळी दर्या, जाधववाडी, बाबुळवाडे, राऊत वाडी, वेसदरे, वडझिरे, विरोधी, कान्हुर पठार, पुणेवाडि, करंदी, किन्हीं, बहिरोबा वाडी, पिंपळगाव, हत्तलखिंडी आदी गावांमध्ये शिबीर होणार असून जास्तीत जास्त रुग्णांनी सहभाग घ्यावा असे आवाहन डॉ श्रीकांत पठारे व डॉ पद्मजा पठारे यांनी केले आहे. शिबिरासाठी डॉ श्रीकांत पठारे 9226129131, डॉ पद्मजा पठारे 9422756749, प्रमोद पठारे 9763860486, प्रशांत निंबाळकर 8600082287 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments