अन्याय निर्मूलन सेवा समितीच्या पारनेर तालुका उपाध्यक्षपदी सुनील तांबोळी यांची निवड

 


पारनेर प्रतिनिधी

अन्याय निर्मूलन सेवा समितीच्या पारनेर तालुका उपाध्यक्षपदी पारनेर तालुक्यातील सावरगाव (काळेवाडी) येथील सुनील तांबोळी यांची निवड करण्यात आली आहे.


        पारनेर तालुक्यातील सावरगाव (काळेवाडी) येथे जाणता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष असून प्रतिष्ठाण च्या माध्यमातून सुनील तांबोळी हे टाकळी ढोकेश्वर येथे समाजसेवी काम करत आहेत. अतिशय सामान्य कुटुंबातून समाजसेवा करणारा तरुण गोरगरिबांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होत आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत अन्याय निर्मूलन सेवा समितीच्या वतीने तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सुनील तांबोळी यांच्या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष अरुण रोडे, तालुकाध्यक्ष पप्पू कासुटे, एकनाथ रोकडे, निघोजचे सरपंच सचिन पाटील वराळ, युवासेना तालुका उपप्रमुख अमोल ठुबे, कान्हूर पठार ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर ठुबे पाटील, वडगाव दर्या ग्रा. प सदस्य सुभाष परांडे, युवा उद्योजक कैलास कोठावळे, रामभाऊ तराळ,  कान्हूर पठार जाणता राजा प्रतिष्ठान अध्यक्ष किरण ठुबे, आदींनी सुनील तांबोळी यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments