कुरुंदमध्ये कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त मिठाई वाटप

 


पत्रकार निलेश शेंडगे व ग्रा.प.सदस्य प्रमिला शेंडगे यांच्या वतीने मिठाई वाटप

पारनेर प्रतिनिधी:-

कुरुंद ता-पारनेर येथील पत्रकार निलेश शेंडगे व ग्रामपंचायत सदस्य तथा राष्ट्रवादी युवती संघटक पारनेर सौ प्रमिलाताई निलेश शेंडगे तसेच आमदार निलेश लंके प्रतिष्ठान कुरुंद यांच्या वतीने आज कुरुंद मध्ये गावासाठी काम करणारे आरोग्य सेविका, वायरमन, ग्रामपंचायत कर्मचारी, कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक, स्वस्त धान्य वितरक दुकानदार यांना दिवाळीनिमित्त मिठाईचे वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या. शेंडगे यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे.


गावासाठी काम करणारे अधिकारी , कर्मचारी हे गावाच्या सेवेसाठी कायमच तत्पर असतात म्हणूनच कायमच सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या शेंडगे यांनी मिठाई देऊन त्यांना प्रोत्साहन दिले आहे.


Post a Comment

0 Comments