शिवबा संघटनेच्या किल्ले बनवा स्पर्धेत चिमुकल्यांचा उत्स्फूर्त सहभाग
पारनेर प्रतिनिधी
स्मार्ट फोनच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम राबवावेत व त्यांच्या कल्पनाविश्वात रमावे यासाठी शिवबा संघटना यांच्या वतीने किल्ले बनवा भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यानिमित्ताने पाबळ येथील कृष्णा ज्ञानेश्वर कवडे व कुमारी दिव्या संतोष कवडे या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिवनेरी शिवजन्मभूमी ची प्रतिकृती साकारली आहे.
पारनेर तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यांच्या संकल्पनेतून "किल्ले बनवा" स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत पारितोषिक मिळवणाऱ्यांना बक्षिसे देखील दिली जाणार आहेत. याच स्पर्धेत पारनेर तालुक्यातील पाबळ येथील कृष्णा ज्ञानेश्वर कवडे व कुमारी दिव्या संतोष कवडे यांनी सहभाग घेऊन शिवनेरी शिवजन्मभूमी प्रतिकृती साकारली आहे. ही प्रतिकृती साकारताना त्यांनी कागद, पुठ्ठा, माती यासारख्या पर्यावरण पूरक गोष्टींचा वापर करत किल्ला बनविला आहे. किल्ला बनवण्यासाठी त्यांनी अगोदर किल्ल्याची पूर्ण माहिती घेत, किल्ल्याचा आकार रेखाटत त्यामध्ये शिवजन्मस्थळ ,प्रथम महा दरवाजा, गडावरील सर्व सात दरवाजे, शिवाई मंदिर अशी महत्त्वाचे स्थळ त्यांनी दाखवली आहेत. यासाठी त्यांना कला शिक्षक ज्ञानेश्वर कवडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. हा किल्ला शिवबा संघटना आयोजित किल्ले बनवा स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे.
या हुबेहूब बनवलेल्या प्रतिकृती मुळे पारनेर तालुक्यात या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. हे दोन्ही विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेच्या साईनाथ हायस्कूल अळकुटी विद्यालयाचे विद्यार्थी असून माजी रयत सेवक कलाध्यापक रामदास कवडे सर यांचे नातू आहेत.
0 Comments