कान्हूर पठाराच्या पुरातन महादेव मंदिराला पुन्हा झळाळी ग्रामस्थांच्या सहकार्यातून दीपमाळ प्रज्वलित करून मंदिर परिसरात एक हजार दिव्यांची आरास


 

कान्हूर पठाराच्या पुरातन महादेव मंदिराला पुन्हा झळाळी

ग्रामस्थांच्या सहकार्यातून दीपमाळ प्रज्वलित करून मंदिर परिसरात एक हजार दिव्यांची आरास



पारनेर प्रतिनिधी


कोरोना काळात बंद असलेली मंदिरे उघडल्याच्या नंतर प्रथम सोमवार निमित्त व या वर्षी परतीच्या पावसाने पारनेर तालुक्यातील महादेव मंदिर येथील पुरातन बारव व गावातील सर्व तलाव ओढे नाले सुद्धा तुडूंब भरले आहे. या निमित्त कान्हूर पठार मधील अत्यंत पुरातन असणाऱ्या श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरात सर्व ग्रामस्थांच्या व शिवभक्तांच्या सहकार्याने मंदिर प्रांगणात दिवे लावुन व सिदधेश्वर महादेवाच्या  नंदीसमोरील छत्री समोरची दिपमाळ पेटवुन १००० दिव्यांची आरास करून श्री . सिद्धेश्वर महादेव मंदिरात शिवभक्त अमोल ठुबे यांच्या पुढाकाराने उपसरपंच सागरदादा व्यवहारे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर दादा ठुबे पाटील अरुण करोशी, अभिजीत घोडके, प्रशांत बागले ,विनायकराव कुटे, बंडूशेठ कंदलकर,  ईश्वर बागले, प्रशांत धोत्रे, सोनू ठुबे, किरण गोरे यांच्या उपस्थितीत श्री सुनिल भाऊ आतकर यांना आरतीचा मान देऊन श्री सिद्धेश्वर देवस्थानाची  आरती करण्यात आली.


कान्हुर पठार गावात असणाऱ्या श्री.सिद्धेश्वर महादेव मंदिरास ४०० ते ५०० वर्ष जुना वारसा आहे तसा लेखी शिलालेख सुद्धा मंदिराच्या लगतच असणार्या पुरातन बारवेच्या दगडावर कोरलेला आहे. इथून पुढे दर सोमवारी सिद्धेश्वराची दगडी दीपमाळ प्रज्वलीत करून सर्व ग्रामस्थांच्या उपस्तीथीत आरती करणार आहोत. देवस्थान ट्रस्ट नूतनीकरण करनार आहोत व सिद्धेश्वर देवस्थानास क वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व कान्हुर पठार ग्रामस्थ प्रयत्नशिल असणार आहोत.

ग्रामस्थ:अमोल एकनाथ ठुबे

Post a Comment

0 Comments