जवळ्यातील राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते सुभाषराव रासकर शिवसेनेत
उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले व पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
पारनेर प्रतिनिधी
राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार असले तरी देखील सरकार मधील शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस मधील कार्यकर्त्यांचे एकमेकांच्या पक्षात इनकमिंग-आऊटगोइंग होताना दिसत आहेत. पारनेर तालुक्यातील जवळे येथील राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते सुभाषराव बाबाजी रासकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले व पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांनी रासकर यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
सुभाषराव रासकर हे पूर्वाश्रमीचे जवळ्यातील राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते. रासकर यांचा जवळ्यामध्ये मोठा जनसंपर्क आहे. शिवसेनेच्या विचारांवर प्रेरित होऊन कोव्हीड काळात पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांनी केलेल्या सामाजिक कामावर प्रेरित होऊन सुभाषराव रासकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुभाषराव रासकर यांच्या शिवसेना प्रवेशबद्दल शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शिवसेना गणप्रमुख मंगेश सालके, सामाजिक कार्यकर्ते गोरख पाटील सालके, संतोष पठारे, आदी उपस्थित होते.
शिवसेनेला येणार बळकटी
जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुभाषराव बाबाजी रासकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर रासकर यांचा शिवसेना पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कान्हूर पठार गटात शिवसेनेला बळकटी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
0 Comments