भाऊसाहेब शिंदे यांचे सामाजिक कार्य प्रेरणादायी : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

समासेवक भाऊसाहेब शिंदे यांना महाराष्ट्राचा कोविड योद्धा सन्मान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे प्रदान करण्यात आला.  यावेळी प्रसिद्ध सिने अभिनेत्री दिपाली सय्यद उपस्थितीत होत्या. छाया - हुसेन पटेल...

प्रतिनिधी - हुसेन पटेल  : जगातील सर्वात तरुण समाज सेवक म्हणून भाऊसाहेब शिंदे यांच्या कार्याची दखल वर्ल्ड बुक ऑफ युरोप ने घेऊन सन्मानित केले होते. संपूर्ण जगात कोरोना चे संकट आल्या नंतर  अनेक लोकांचे जीव गेले, अनेकांचे संसार उधवस्त झाले या काळात त्या कुटूंबाला आधार देण्याचं काम सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांनी केले


भाऊसाहेब शिंदे यांनी स्व:ता च्या जीवाची परवा न करता अनेक संसार उभे केले कोरोना काळात लोकांना जेवण उपलब्ध करून दिले, घरोघरी जाऊन सेनिटाईझर फवारणी केले, दवाखान्यात घेऊन जाणे अरसनिक अल्बम च्या गोळया चे मोठया प्रमाणवर वाटप, अनेक कोरोना पेसेंट ला बेड उपलब्ध करून दिले 


त्या दरम्यान भाऊसाहेब शिंदे यांना कोरोना ची लागण झाली मुर्त्यू शी 14 दिवसाची यशस्वी झुंज दिल्या  नंतर पुन्हा कोरोना व्यक्ती च्या मदतीला धावून गेले

भाऊसाहेब शिंदे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात मूर्ती लहान कीर्ती महान असणारे व्यक्ती महत्त्वाची निवड महाराष्ट्र चा कोरोना यौद्धा म्हणून करण्यात आली व राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व सिने अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद यांच्या शुभ हस्ते राजभवन मुंबई येथे सन्मानित करण्यात आले. यावेळी सन्मान चिन्ह, टॉफी, पन्नास हजार रुपये देण्यात आले


 

कोण आहेत भाऊसाहेब शिंदे


जगातील सर्वात तरुण समाज सेवक म्हणून भाऊसाहेब शिंदे यांच्या सामाजिक कार्याची दखल वर्ल्ड बुक ऑफ युरोप ने घेऊन त्यांना सन्मानित केले होते. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव या त्यांच्या मामा च्या गावी त्यांचा जन्म झाला.

त्यांचे मूळ गाव हे नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे त्यांनी त्यांचे माध्यमिक  शिक्षण पूर्ण केले त्या नंतर त्यांचे कॉलेज चे शिक्षण हे अहमदनगर येथे पूर्ण झाले शिक्षण पूर्ण झाल्या नंतर शिंदे यांना एका बँकेत शिपाई या पदावर घेण्यात आले त्या ठिकाण च काम पाहून त्यांना कॅशियर या पदावर प्रमोशन भेटले पण भाऊसाहेब शिंदे त्यांचं मन मात्र तिथं रमल नाही त्यांनी ही नोकरी सोडून थेट भेट त्या वेळी चे केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार साहेब यांना दिल्ली येथील निवास स्थानी जाऊन भेटले साहेबांना सांगितले मी नोकरी सोडली व पवार साहेबांच्या पायाला स्पर्श करून आशिर्वाद घेतला त्यावेळी शरद पवार साहेबांनी त्यांना विचारले आता पुढे काय करणार त्यावेळी त्यांनी साहेबांना सांगितलं मला तुमचा सारखं बनायचं त्या नंतर पवार साहेबांनी त्यांना एक कानमंत्र दिला त्या नंतर त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याला सुरुवात केली.

Post a Comment

0 Comments