उपसरपंच विकास सावंत हे सुसंस्कृत नेतृत्व - डॉ श्रीकांत पठारे
वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरे व्हावेत - डॉ श्रीकांत पठारे
पारनेर प्रतिनिधी
देवीभोयरे गावचे माजी उपसरपंच विकास सावंत हे सुसंस्कृत व तरुण युवा नेतृत्व असून त्यांना राजकीय भवितव्य उज्वल आहे. तरुणांनी सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करायला पाहिजे असे मत पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांनी व्यक्त केले.
पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील माजी उपसरपंच विकास सावंत यांचा वाढदिवस देवीभियरे ग्रामस्थांनी साजरा केला. यावेळी पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कान्हूर पठार येथील सामाजिक कार्यकर्ते युवा नेते अमोल ठुबे यांचादेखील वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला. यावेळी शुभेच्छा देताना डॉ पठारे म्हणाले की, उपसरपंच विकास सावंत यांचे देवीभोयरे गावच्या सामाजिक व राजकीय तसेच विकास कामांमध्ये मोठे योगदान आहे. तरुण चेहरा राजकारणात असून त्यांना राजकारणात मोठे भविष्य आहे. तरुणांनी त्यांचा आदर्श घेणे गरजेचे असल्याचे डॉ पठारे म्हणाले. यावेळी विकास सावंत यांच्यावतीने देवीभोयरे गावातील सर्व शाळांना प्रथमोपचार पेट्या भेट देण्यात आल्या. यावेळी देवीभोयरे गावातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व मित्रपरिवार तसेच असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments