शिवसेनेच्या पारनेर तालुका महिला आघाडी प्रमुखपदी प्रियांका खिलारी यांची निवड


 
शिवसेनेच्या पारनेर तालुका महिला आघाडी प्रमुखपदी प्रियांका खिलारी यांची निवड

पारनेर प्रतिनिधी

शिवसेना पारनेर तालुका महिला आघाडीच्या प्रमुखपदी टाकळी ढोकेश्वर येथील प्रियांका अतुल खिलारी यांची निवड करण्यात आली. विधानसभेचे माजी उपाध्यक्ष ना. विजयराव औटी यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. 


      गृहिणी असताना देखील सामाजिक व राजकीय कार्यात  असणारी आवड यामुळे प्रियांका खिलारी यांची शिवसेना पारनेर तालुका महिला आघाडीच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली. प्रियांका यांचे माहेर हे पारनेर तालुक्यातील सिद्धेश्वर वाडी असून सासर टाकळी ढोकेश्वर आहे. चुलते ताराचंद कावरे हे सिद्धेश्वर वाडीचे सरपंच होते तर सासरे बाबासाहेब खिलारी हे टाकळी ढोकेश्वर चे उपसरपंच होते. प्रियांका यांचे आजे-सासरे काशीनाथ खिलारे हे पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती होते तर दुसरे आजे-सासरे कृष्णराव उर्फ किसन पाटील खिलारी हे नगर-पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संस्थापक सभापती होते. सासर व माहेर मधील कुटुंब हे सामाजिक व राजकीय कामात असल्याने प्रियांका यांना देखील समाजकार्याची आवड होती. त्यांच्या समाजकार्याची दखल घेत शिवसेनेच्या वतीने त्यांची पारनेर तालुका महिला आघाडीच्या प्रमुख पदी निवड करण्यात आली. विधानसभेचे माजी उपाध्यक्ष ना. विजयराव औटी यांच्या हस्ते प्रियांका खिलारी यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दाते सर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, पंचायत समिती सभापती गणेश शेळके, पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे, राहुल पाटील शिंदे, शंकरराव नगरे, प्रमोद पठारे, अतुल खिलारी, सुखदेव पवार आदींनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments