स्व. बखर यांचे कर्तृत्व आदर्शवत : सरपंच भाऊसाहेब शिंदे
मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठान मध्ये स्वर्गीय बखर यांची जयंती साजरी
भाऊसाहेब शिंदे यांनी मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानच्या कार्याचा केला गौरव
पारनेर प्रतिनिधी :
फादर हर्मन बखर याचं नाव उद्यानाला देऊन त्यांच्या कर्तृत्वाचा केलेला सन्मान ही एक गौरवाची बाब असून स्व. बखर यांचे कर्तृत्व आदर्शवत होते असे प्रतिपादन वडगाव सावताळ चे माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे यांनी केले. कर्जुले हर्या येथील मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठान आयोजित स्व. फादर हरमन बखर यांच्या 97 व्या जयंती च्या निमित्ताने आयोजित एक दिवसीय वृक्षरोपण कार्यशाळा प्रसंगी ते बोलत होते. या वेळी बोलताना त्यांनी स्व. बखर यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला . जलसंधारण क्षेत्रांत एक नवी क्रांती बाखर बाबा यांच्या मुळे आले व त्यामुळे तालुक्यातील गावांना फायदा झाला असे कृषी अधिकारी डॉ. माधवराव शिंदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.या प्रसंगी त्यांनी मातोश्री शैक्षणिक संकुल न तयार केलेल्या स्व. फादर हरमन बाखर उद्यानत केलेल्या आयुर्वेदिक झाडांच्या लागवडी बद्दल समाधान व्यक्त केले व संस्थेचे कौतुक केले. यावेळी वडगाव सावताळचे माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे, प्रा. दातीर, आदर्श शिक्षक राजेश चौरे ,माती परिक्षण अधिकारी पानसरे ,पत्रकार दादा भालेकर उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांचा सत्कार संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. दीपक आहेर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. पवार सर, प्राचार्य वाकळे सर, प्राचार्य यशवंत फापाळे सर व शिक्षक वृंद उपस्थित होते. या वेळी पाहुण्याच्या हस्ते गुडमार या वृक्षाची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तुषार ठुबे यांनी केले तर आभार उपप्राचार्य भाऊसाहेब शिंदे यांनी मानले.
फादर हर्मन बखर यांनी खूप चांगले समाजसुधारणेचे काम केले आहे. मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठान त्यांच्या कार्याचा गौरव करत असून उद्यानाला दिलेले नाव हा त्यांचा सन्मानच आहे. मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्षेत्रामध्ये उत्तम कार्य सुरू असून डॉ. दीपक आहेर व किरण आहेर हे समाजासाठी उत्तम कार्य करत आहेत.
भाऊसाहेब शिंदे (मा. सरपंच वडगाव सावताळ)
0 Comments