राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पारनेर तालुका संघटकपदी प्रमिला शेंडगे

 


पारनेर प्रतिनिधी

कुरुंद ता-पारनेर येथील ग्रामपंचायत सदस्य प्रमिला निलेश शेंडगे यांची नुकतीच राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या पारनेर तालुका संघटक पदी निवड झाली. आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली युवती तालुका अध्यक्ष पुनमताई मुंगसे यांनी त्यांची निवड केली.  महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष रुपालिताई चाकणकर यांच्या हस्ते शेंडगे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला संधी देण्याचे काम आमदार निलेश लंके करत आहेत.


या निवडीचे आमदार निलेश लंके ,जिल्हा परिषद सदस्य राणी ताई लंके, युवती जिल्हाध्यक्ष राजेश्वरी कोठावळे, पारनेर तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष बाबाजी तरटे,युवती अध्यक्ष पुनमताई मुंगसे, युवक अध्यक्ष विक्रम कळमकर,सुदाम पवार, युवक प्रदेशाध्यक्ष जितेन सरडे, विजुभाऊ औटी, अनिल गंधाकते तसेच कुरुंद मधील सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी यांनी सौ.शेंडगे यांचे अभिनंदन केले.

पदाच्या माध्यमातून तालुक्यातील युवतीचे संघटन करून, तसेच युवतीच्या  व महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी भविष्यात काम करणार असल्याचे शेंडगे यांनी बोलताना सांगितले

Post a Comment

0 Comments