कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे इंटरनॅशनल आयडल ॲवार्ड व ऑडियन्स चॉईस ॲवार्ड ने सन्मानित




पारनेर / प्रतिनिधी

निर्माण फाउंडेशन नाशिक या संस्थेच्या वतीने नुकतेच समाज सेवा ,आरोग्यसेवा,शिक्षण विभाग व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविले.शिक्षण विभाग व कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या इंग्लिश स्कूल पारनेर येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत असणारे श्री.ज्ञानेश्वर रामदास कवडे सर यांना इंटरनॅशनल आयडल ॲवार्ड व २०० ॲवार्ड स्पर्धकामधून सर्वात जास्त लाइक्स मिळाल्याने ऑडियन्स , चॉईस ॲवार्ड त्यांना कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मिस इंडिया इंटरनॅशनल युनिव्हर्स क्वीन शिल्पी अवस्थी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.याप्रसंगी आफ्रिकन स्कॉलर सेनसाई बिडम,समाजसेविका आरती हिरे,विश्वस्त निर्वाण फाउंडेशन विमलताई बोडरे व अध्यक्ष निलेश आंबेडकर उपस्थितीत होते.आदित्य हॉल श्री गुरू गोविंदसिंग कॉलेज नाशिक या ठिकाणी सन्मानित करण्यात आले.



या सोहळ्यात दोन पुरस्काराने सन्मानित झालेले श्री कवडे सर यांचे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे साहेब, सचिव जीडी खानदेशी,विश्वस्त जयवंत वाघ,पारनेर पं.स.सभापती मा. राहुल झावरे,जिल्हा कला संघाचे अध्यक्ष संजय पठाडे ,शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे प्रसिद्ध शिवव्याख्याते प्राध्यापक ज्ञानेश्वर कवाद तसेच विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब करंजुले उपप्राचार्य गोरक्षनाथ रेपाळे पर्यवेक्षक अंकुश अवघडे कलाशिक्षक सर्व शिक्षक बंधू भगिनी वमित्र परिवार यांनी अभिनंदन व कौतुक केले.

Post a Comment

0 Comments