संगमनेर तालुक्यातील खांडगाव मध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्षानिमित्त शेतकरी बांधवांना मोफत 7/12 सातबारा उताऱ्यांचे वाटप

 संगमनेर तालुक्यातील खांडगाव मध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्षानिमित्त शेतकरी बांधवांना मोफत 7/12 सातबारा उताऱ्यांचे वाटप

छाया - हुसेन पटेल संगमनेर

संगमनेर - प्रतिनिधी

खांडगाव,संगमनेर : महसूल विभाग, महाराष्ट्र शासन मार्फत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीकृत मोफत ७/१२ वाटप आज दिनांक २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती पासून सुरू करण्यात येत आहे. या योजनेची सुरुवात करून आज संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे करण्यात आला.

     शेतकरी बांधवांना सुधारित नमुन्यातील डीजीटल स्वाक्षरीत 7/12 सातबारा तहसीलदार श्री. अमोल निकम साहेब,व नायब तहसीलदार कडनर साहेब,यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.याप्रसंगी स्वामी दयानंदगिरी महाराज, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी कारखान्याचे संचालक रमेश भाऊ गुंजाळ,तालुका विकास अधिकारी थोरात साहेब,सर्कल मोरे मॅडम, तलाठी शिंदे मॅडम, पोलीस पाटील छायाताई गुंजाळ,सरपंच भरत गुंजाळ,ग्रामसेवक विशाल काळे साहेब तंटामुक्ती अध्यक्ष दामोधर गुंजाळ,संजय गुंजाळ,शिवाजी वर्पे,लक्ष्मण गुंजाळ ,अॅड.विकास गुंजाळ,सखाराम काळे,पांडुरंग गुंजाळ ,दादासाहेब रूपवते,विठ्ठल गुंजाळ व ग्रामस्थ उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments