
गांजिभोयरे(ता-पारनेर) येथे शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी बद्दल मार्गदर्शन करताना कामगार तलाठी आकाश जोशी. समवेत उपस्थित शेतकरी (छाया - चंद्रकांत कदम)
गांजीभोयरेत ई पिक पाहणी नोंदणी मार्गदर्शन कार्यशाळा
शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; तलाठ्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथे युवा ग्रामविकास प्रतिष्ठाण व आमदार निलेशजी लंके प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने ई-पिक पाहणी नोंदणी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कामगार तलाठी आकाश जोशी यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी ई पिक पाहणी नोंदणी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस शेतकऱ्यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला
ई-पीक पाहणी हा शासनाचा पथदर्शी प्रकल्प शेतकरी हिताचा कसा आहे ! हे सांगताना राज्यातील 20 तालुक्यात हा पकल्प राबविल्यानंतर त्याची उपयुक्तता लक्षात घेऊनच हा प्रकल्प राज्यव्यापी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ई पिक पाहणी नोंदणीमुळे पिक विमा, पिक कर्ज,तसेच शासकीय योजनांचा लाभ घेणे सुलभ होणार आहे. सात बारा वर अचुक पिक पेरा नमुद असणे शेतकरी बांधवांच्या हिताचे असुन विकेल ते पिकेल या धोरणाला अनुसरून हि माहिती कृषी बाजार पेठासाठी उपयुक्त ठरणार आहे. एका मोबाईल वरून विस खातेदारांची पिक पाहणी अपलोड करावयाची सोय असल्याने एका वस्ती/वाडीवर काही शेतकरी बांधव यांचेकडे स्मार्ट फोन असला तरी ई पिक पाहणी १००% होण्यास काहीही अडचण येणार नाही. नुकत्याच झालेल्या ८ सप्टेंबर २०२१ च्या राज्यस्तरीय अंमलबजावणी समितीच्या बैठकीत खरीप हंगाम ची पिक पाहणी शेतकरी यांनी करण्यासाठीची १५ संप्टेबर ची मुदत ३० संप्टेबर पर्यंत वाढविण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे पिक पेरा नोंदणीसाठी शेतकरी बांधवाकडे पुरेसा वेळ असुन मुदतीच्या आत आपली ई पिक पाहणी नोंदवावी. ई पिक पाहणी ॲपमध्ये विहीर, जनावरांचा गोठा,कांदाचाळ बांधावरील,शेतातील फळझाडे शेततलाव यांसह शेतिविषयक भरपुर माहीती समाविष्ठ करता येत असल्यामुळे शेतकरी बांधवांना सक्षम करणाऱ्या व शेती क्षेत्रात डिजिटल क्रांती समजुन या ई पिक पाहणी प्रकल्पाचा व ई पिक पाहणी मोबाईल ॲपचा लाभ घ्यावा असे कामगार तलाठी आकाश जोशी यांनी सांगितले. आभार रावसाहेब झंझाड यांनी मानले. यावेळी उपसरपंच आनंदराव झंझाड, सेवा संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब खोडदे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज तामखडे, सचिव रावसाहेब झंझाड, उपाध्यक्ष उत्तम पांढरे, गणप्रमुख अक्षय झंझाड, बाबासाहेब खोडदे, सदस्य बाळासाहेब पांढरे, शरद खोडदे यांसह शेतकरी बाळासाहेब खोडदे, रंगनाथ खोडदे, कारभारी पांढरे, भरत खोडदे, भानुदास पांढरे, शिवाजी खोडदे, भानुदास पांढरे, बाळासाहेब खणसे, पोपट देंडगे, जालिंदर थोरात, तुषार खोडदे, भास्कर पांढरे, शब्बीर शेख, सुभाष पांढरे, दादाभाऊ निमोणकार आदींसह शेतकरी उपस्थित होते.
0 Comments