तलाठ्यांच्या कामबंद आंदोलनाच्या विरोधात कान्हूरपठारमध्ये नागरिकांचे आंदोलन तलाठी कार्यालयाला चपलांचा हार घालून नागरिकांनी केला निषेध

तलाठ्यांच्या कामबंद आंदोलनाच्या विरोधात कान्हूरपठारमध्ये नागरिकांचे आंदोलन

तलाठी कार्यालयाला चपलांचा हार घालून नागरिकांनी केला निषेध


पारनेर / प्रतिनिधी

  गेल्या ८,९ दिवसांपासून पारनेर तालुक्यातील तलाठ्यांनी तहसीलदारांच्या विरोधात काम बंद आंदोलन पुकारले आहे. काम बंद आंदोलनामुळे सर्वसामान्य जनतेची कामे मार्गी लागत नसल्याने या तलाठ्यांच्या आंदोलनाच्या व त्यांच्याकडून सर्वसामान्यांची होत असणाऱ्या अडवणुकीच्या विरोधात पारनेर तालुक्यातील कान्हूर पठारमध्ये नागरिकांनी तलाठी कार्यालयासमोर आंदोलन केले.


       कामबंद आंदोलन करुन सर्वसामान्य जनतेची अडवणूक करणाऱ्या तलाठी यांचा निषेध व्यक्त करण्यात आला .या वेळी तलाठी कार्यालयाला चप्पलचा हार घालुन ग्रामस्थ तर्फे  निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी कानहुर पठार  चे लोकनियुक्त सरपंच गोकुळ मामा काकडे,ग्रामपंचायत सदस्य दर्शन काकडे,अमोल ठुबे, रूषाल ठुबे, रविंद्र ठुबे,राजेंद्र ठुबे,सुमित नवले,अक्षय नवले,गणेश ठुबे,किरण लोंढे, गवाजी नाना ठुबे,संकेत झावरे,अक्षय गोरडे,राजू बोरूहाडे, व ग्रामस्थ उपस्थित होते. तलाठ्यांनी लवकरात लवकर कामावर हजर होऊन नागरिकांचे प्रश्न सोडवण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.



       सर्वसामान्य जनतेची अडवणूक थांबवा - सरपंच काकडे

तलाठ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे नागरिकांची अनेक कामे प्रलंबित आहेत. तलाठ्यांनी तातडीने कामावर हजर होऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावायला पाहिजे. व नागरिकांची होणारी अडवणूक थांबवा असे आवाहन कान्हूर पठारचे सरपंच गोकुळमामा काकडे यांनी केले आहे.

      

 

अन्यथा तलाठ्यांच्या घरावर आंदोलन - अमोल ठुबे

तलाठ्यांनी तातडीने कामावर हजर होऊन जनतेचे प्रलंबित कामे मार्गी लावावीत. तलाठ्यांच्या कामकाजाबाबत आधीच जनतेची नाराजी आहे. त्यात आंदोलन करून नागरिकांना वेठीस धरण्याचे काम तालाठ्यांकडून होत आहे. यात तलाठ्यांनी सुधारणा करून कामावर हजर व्हावे अन्यथा तलाठ्यांच्या घरांसमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अमोल एकनाथ ठुबे यांनो दिला आहे.

Post a Comment

0 Comments