पारनेर तालुका युवासेना उपतालुका प्रमुख पदी सुभाष सासवडे यांची निवड

 

पारनेर तालुका युवासेना उपतालुका प्रमुख पदी सुभाष सासवडे यांची निवड

 पारनेर तालुक्यात शिवसेनेला मिळणार बळकटी


पारनेर प्रतिनिधी
         पारनेर तालुक्यातील धोत्रे गावातील तरूण कार्यकर्ते सुभाष सासवडे यांची पारनेर तालुका युवासेना उपतालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. सासवडे यांच्या निवडीने पारनेर तालुक्यात शिवसेनेला बळकटी मिळणार आहे.



     धोत्रे गावातील तरुण कार्यकर्ते सुभाष सासवडे यांची शिवसेना पक्ष प्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांचे आदेशाने व मा. ना. विजयराव औटी साहेब यांचे शिफारशीने सासवडे यांची पारनेर तालुका युवा सेना उपतालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर  यांच्या हस्ते  माजी महापौर अभिषेक कळमकर, नगर शहर प्रमुख दिलीप सातपुते, बाळासाहेब बोराटे यांचे उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले. निवडीबद्दल  सुभाष सासवडे यांचे माजी आमदार नामदार विजयराव औटी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापती काशिनाथ दाते, पंचायत समिती सभापती गणेश शेळके, शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहोकले, युवासेना तालुकाप्रमुख नितीन शेळके, पारनेर शहर प्रमुख निलेश खोडदे, शंकर नगरे,शिवसैनिक नंदकुमार भांड शेखर, पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांनी व धोत्रे गावातील नागरिकांनी सुभाष सासवडे यांचा सन्मान केला. सुभाष सासवडे यांची शिवसेना पक्षावरील असणारी निष्ठा व सामाजिक योगदान याची दखल घेऊन शिवसेना पक्षाने युवासेना उपतालुका प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे. सुभाष सासवडे यांच्या निवडीने पारनेर तालुक्यात शिवसेना पक्षाला आणखी बळकटी मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments