राजुशेठ बेलोटे यांची कोकणातील पूरग्रस्तांना मदत... १५० कुटुंबांना केले कपड्याचे वाटप..!

 


राजुशेठ बेलोटे यांची कोकणातील पूरग्रस्तांना मदत...

 १५० कुटुंबांना केले कपड्याचे वाटप..!

 पारनेर प्रतिनिधी

         अतिवृष्टी पाऊस पूर परिस्थिती यामुळे  मोठ्या प्रमाणात  नुकसान झाल्यामुळे कोकणातील तळीये गावाला  पारनेर येथील कांदा व्यापारी राजुशेठ बेलोटे यांनी भेट दिली.  या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे बेलोटे यांनी १५० कुंटुबांना कपडे  व इतर वस्तूंचे वाटप केले. 


 पूर परिस्थिती व नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून कांदा व्यापारी राजुशेठ बेलोटे यांनी त्या भागातील दुःख जाणून घेतले व एक सामाजिक दायित्व म्हणून १५० कुटुंबांना मदत केली.  यावेळी कैलास बेलोटे उपस्थित होते. राजुशेठ बेलोटे हे नेहमीच सामाजिक कामांमध्ये पुढे असतात ते करत असलेले सामाजिक कामे निश्चितच सन्मानजनक आहेत.  राजुशेठ बेलोटे हे उन्हाळ्यामध्ये पानपोही, वृद्धाश्रमांना भेटी, वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप असे विविध उपक्रम नेहमी राबवत असतात. राजुशेठ बेलोटे यांची नेहमीच समाज कार्यात अग्रेसर अशी भूमिका असते. गोरगरिबांना मदत करणं हे स्वतःच भाग्य समजतात कोकणातील बांधवांना मदत करून राजुशेठ बेलोटे यांनी एक मदतीचा हात पुढे केला आहे.

Post a Comment

0 Comments