बोर्डो मिश्रण कसे बनवावे याबाबत कृषिकन्या ऋतुजा शेळकेचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 

(छाया- शरद रसाळ, सुपा)


 सुपा प्रतिनिधी

      महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत ग्रामीण कृषी जागृकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम सन-२०२१-२३ अंतर्गत विविध गावांमध्ये उपक्रम राबविला जात आहे. 

     या कृषी कार्यक्रमांतर्गत पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील कृषिकन्या ऋतुजा संतोष शेळके हिने वाडेगव्हाण येथील शेतकऱ्यांना बोर्डो मिश्रण तयार करण्याबाबत माहिती दिली.

     बोर्डो मिश्रणचे फायदे सांगत कृषिकन्या शेळके म्हणाली की, बोर्डो मिश्रणाचा फळ झाडांवर फवारणी साठी उपयोग केल्यास बुरशी थांबवता येते. उत्पादनात व फळांच्या गुणवत्तेत मोठी वाढ होते. शेतकऱ्यांना फळबागात चांगला फायदा नफा मिळू शकतो. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     ऋतुजाला साईकृपा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. एच. निंबाळकर, कार्यक्रमाधिकारी प्रा. ए.ए. शिंदे, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. एस. बंडगार यांचे मार्गदर्शन लाभले.


Post a Comment

0 Comments