![]() |
| छाया - शरद रसाळ सुपा |
शेतकऱ्यांना शेती मोबाईल ॲपचे कृषिकन्या ऋतुजा कडून मार्गदर्शन
आधुनिक शेतीबाबत ऋतुजा कडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
सुपा प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील शेतकऱ्यांना राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत साईकृपा कृषी महाविद्यालय घारगाव ता. श्रीगोंदा येथील सातव्या सत्रातील कृषिकन्या ऋतुजा संतोष शेळके हिने कोव्हीड-१९ मुळे कॉलेज बंद असताना ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेती विषयक नवीन तंत्रज्ञान मोबाईल द्वारे कसे वापरावे याविषयी नवीन ॲपची माहिती देऊन मार्गदर्शन केले.
यावेळी शेतीवर आधारित प्रात्यक्षिके सादर करणे, शेतजमीन व्यवस्थापन व पीक उत्पादन या विषयावर आधारित तसेच शेती आधारित तंत्रज्ञान मोबाइलद्वारे कसे वापरावे या विषयी नवीन ॲपची माहिती दिली. ॲग्रोवण, महाधन, किसान, भारत ॲग्रो इत्यादीसारख्या अनेक उपयुक्त ॲपची माहिती व त्याचा वापर आणि उपयोग यासोबतच शेतातील तण नियंत्रणाच्या वेगवेगळ्या पद्धतींची माहिती प्रात्यक्षिकांसह करून दाखविण्यात आली तसेच शेतकऱ्यांच्या शेतीच्या असणाऱ्या समस्या व विविध अडचणींवर कोणकोणत्या उपाययोजना करता येतील या विविध विषयावर चर्चा सत्र घेऊन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

0 Comments