सुजित झावरे यांच्या नदीजोड प्रकल्पाचे राज्यपालांकडून कौतुक ; नदीजोड प्रकल्पाची संकल्पना राज्यभर राबवा - राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सुजित झावरे यांच्या नदीजोड प्रकल्पाचे राज्यपालांकडून कौतुक 

नदीजोड प्रकल्पाची संकल्पना राज्यभर राबवा - राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यपालांकडून सुजित झावरेंचा सन्मान

पारनेर प्रतिनिधी

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी पारनेर तालुक्यात केलेल्या नदीजोड प्रकल्पाचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कौतुक करून सुजित झावरे पाटील यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले.असे प्रकल्प महाराष्ट्रभर राबविण्यात यावे यासाठी राज्यपालांनी मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांना पत्रव्यवहार केला आहे.


 पारनेर तालुका हा राज्यातील दुष्काळी तालुका समजला जातो पावसाचे प्रमाण तसे कमीच परंतु गावोगावी जलसंधारणाच्या बाबतीत पावसाचे वाया जाणारे पाणी अडविण्याचा प्रयत्न झाला नाही. अशा परिस्थितीत काही दिवसांपूर्वी पारनेर तालुक्याचे विकासाभिमुख नेतृत्व मा.सुजित झावरे पाटील यांच्या मनात काही दिवसांपूर्वी विचार आला की नदीचे,ओहोळाचे वाया जाणारे पाणी आपण जर एकत्र केले तर अनेक पाझर तलाव,बंधारे भरुन शेतकरी वर्गाला फायदा होईल. यादृष्टीने सुजित झावरे पाटील यांनी नदीजोड प्रकल्प संकल्पना प्रत्यक्ष कृतीत आणली. सुरुवातीला अनेकांनी त्याची खिल्ली उडविली परंतु अढळ विश्वास असल्याने त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील काळकूप पाडळी याठिकाणी हा नदीजोड प्रकल्प कुठलेही विद्युत उपकरण तसेच यंत्र न वापरता केवळ नैसर्गिक उताराच्या सहाय्याने कार्यान्वित केला त्याची फलनिष्पत्ती अशी की पहिल्याच पावसात प्रयोग यशस्वी झाल्यानंतर दोन पाझर तलाव व आठ बंधारे भरुन गेले. तदनंतर वासुंदे गावाजवळील कर्जुले पठारावर वाया जाणारे अनेक ओहोळ एकत्र करुन कालव्याद्वारे पाझर तलावात सोडले. हा प्रयोग यशस्वी होत असताना पहिल्याच पावसात तलाव साधारण ५०% भरला. सदर प्रकल्पाबाबत मागे सुजित झावरे पाटील यांनी महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना माहिती दिली होती. राज्यपाल साहेबांना सदर प्रकल्प आवडल्याने राज्यपाल साहेबांनी सुजित झावरे पाटील यांना पत्र पाठवून सदर प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी राजभवन येथे आमंत्रित केले होते. आज राजभवन येथे महामहीम राज्यपाल भगतसिंह कोशारी  यांनी जलसंधारणाच्या अतुलनीय कार्याबद्दल मा.सुजित झावरे पाटील यांना पुरस्काराने सन्मानित केले. पुरस्कार मिळाल्यानंतर सुजित झावरे पाटील यांनी असे नाविन्यपूर्ण प्रकल्प भौगोलिकदृष्ट्या जिथे शक्य आहे अशा गावांमध्ये राबविले पाहिजेत गावे जलसंधारणाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण होतील हे राज्यपाल साहेबांना पटवून देताच महामहीम राज्यपाल यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून अशा पध्दतीचे नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविण्यासाठी स्वतंत्र बजेट निर्माण करावे तसेच गावे जलसंधारण बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी कार्यवाही करावी याबाबत आदेश दिले. याप्रसंगी पारनेरचे युवा नेते भाऊसाहेब महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा.सुदेश झावरे पाटील, बिहारचे माजी मंत्री शिवप्रताप सिंह व मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments