राळेगण थेरपाळ येथे बसस्थानक लोकार्पण सोहळा संपन्न कै. भास्करराव भागचंद रामकर व कै. सुदाम भागचंद रामकर यांच्या स्मरणार्थ रामकर कुटुंबियांकडून बसस्थानक गावासाठी अर्पण

 राळेगण थेरपाळ येथे बसस्थानक लोकार्पण सोहळा संपन्न

कै. भास्करराव भागचंद रामकर व कै. सुदाम भागचंद रामकर यांच्या स्मरणार्थ रामकर कुटुंबियांकडून बसस्थानक गावासाठी अर्पण

रामकर कुटुंबियांच्या सामाजिक बांधिलकी बद्दल सर्वत्र कौतुक

पारनेर प्रतिनिधी


       

अनेक दिवसांपासून मोडकळीस असलेल्या राळेगण थेरपाळ येथील बसस्थानकाचा प्रश्न राळेगण ग्रामविकास मंच व राळेगण थेरपाळ ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण झाले. राळेगण थेरपाळ येथील दानशूर कुटुंब व व्यवसायानिमित्त पुणे - मुंबई या ठिकाणी स्थायिक असलेले रामकर कुटुंबियांच्या वतीने कै. भास्करराव भागचंद रामकर व कै. सुदाम भागचंद रामकर यांच्या स्मरणार्थ ही बसस्थानक वास्तू लोकार्पण केली. राळेगण थेरपाळ हे गाव शिरूर आळेफाटा ७६१ या राष्ट्रीय महामार्गावर आहे. येथून अनेक विद्यार्थी शिरूर, जवळा, निघोज या ठिकाणी शाळा व महाविद्यालयामध्ये जातात. अनेक कामगार रांजणगाव व सुपा या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये कामानिमित्त बसने प्रवास करतात. ऊन व पाऊस या पासून संरक्षणासाठी बसस्थानक हे गरजेचे होते. रामकर कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकी जपून बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लावल्याने ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

     यावेळी राळेगण थेरपाळ गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच पंकजदादा कारखिले, उपसरपंच अलकाताई घावटे, तंटामुक्ती अध्यक्ष शशिकांत कारखिले, सोसायटी चेअरमन अंकुश कारखिले, डॉ रघुनाथ रामकर, डॉ प्रदिप रामकर, अॅड. संदीप रामकर, बाळासाहेब रामकर, कैलास कारखिले साहेब,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष गणेश लामखडे, तंटामुक्ती उपाध्यक्ष दीपक कारखिले, ग्रामपंचायत सदस्य योगेश आढाव, मंगेश कार्ले, नरेश सोनवणे, माऊली शितोळे, अतुल मोरे, किरण कारखिले, किरण भगवान कारखिले, सतिश कारखिले, सोसायटी संचालक सुखदेव कारखिले, उल्हास गाडिलकर, गौतम कारखिले, पत्रकार जयदीप कारखिले, युवानेते रवीदादा कारखिले, प्रशांत गवळी,पोपटशेठ कारखिले, हिरामण कारखिले, संजय कारखिले, सदाशिव कारखिले, विजूभाऊ कारखिले, भरत शितोळे, दिनेश कारखिले, संदीप शितोळे, संतोष कारखिले, सतिश गाडीलकर, संतोष डोमे, सुभाष गाडिलकर, पांडूरंग कारखिले, कोंडीभाऊ घावटे, बाबा तात्या कारखिले, संजय सालके, संतोष वाढवणे, अतुल गायकर, अंकुश वाढवणे, शंकर तात्या कारखिले, बाळा कार्ले, आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments