........तर नारायण राणेंना शिवसेनेच्या स्टाईलने प्रसाद देऊ - भाऊ कोरगावकर..
राणेंनी हिम्मत असेल तर शिवसैनिकांच्या समोर यावे - कोरगावकर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल अपशब्द वापरल्यामुळे नारायण राणेंवर पारनेर शिवसेनेकडून गुन्हा दाखल...
जनआशिर्वाद यात्रेमधे भाजप चे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल नारायण राणे यांच्यावर पारनेर तालुका शिवसेनेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राणे यांच्या वक्तव्या मुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे पारनेरची शिवसेना आक्रमक झाली आहे.राणेंनी अनेकदा मुख्यमंत्र्यांचा एकेरी शब्दामधे उल्लेख करुन बदनामी केली आहे.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करून नारायण राणेंचा निषेध केला जात आहे.
यावेळी अहमदनगर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांनी नारायण राणे यांना शिवसैनिकां समोर येण्याचे खुले आवाहन केले.राणे समोर आले तर त्यांना शिवसेना स्टाईलनेच प्रसाद देण्यात येईल असे श्री कोरगावकर यांनी सांगीतले.यावेळी पारनेर शिवसेनेचे वतीने पारनेर पोलीस स्टेशनला शिवसेनेचे तालुका प्रमुख विकास रोहकले यांनी लेखी तक्रार दिली आहे.या प्रसंगी शीवसेना उपजिल्हा प्रमुख रामदासजी भोसले,पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, अनिकेतजी औटी,पारनेर शहर प्रमुख निलेश खोडदे,नवनाथ खामकर,ईश्वर आढाव,अमोल गजरे, व शिवसैनिक उपस्थित होते.

0 Comments