जनतेला आर्थिक आधार मिळण्यासाठी संचालकांनी सहकाराच्या चौकटीत राहून काम करावे - ॲड.आझाद ठुबे
गुणोरे येथे जनसमृद्धी पतसंस्थेचे उदघाटन
जनसमृद्धी पतसंस्थेच्या उद्घाटन दिवशी पन्नास लाखांच्या ठेवी, पतसंस्थेला जनतेतून मोठा प्रतिसाद.
पारनेर प्रतिनिधी
जनसमृद्धी पतसंस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आर्थिक आधार मिळण्यासाठी संचालक मंडळाने सहकाराच्या चौकटीत राहून काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व राजे शिवाजी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड.आझाद ठुबे यांनी व्यक्त केले आहे.पारनेर तालुक्यातील गुणोरे येथील जनसमृद्धी पतसंस्थेचे उद्घाटन पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ भास्कर शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आले.जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्वनाथ कोरडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी ॲड.ठुबे यांनी उपस्थीतांना मार्गदर्शन करताना बोलत होते.यावेळी पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, आण्णा हजारे युवामंचचे अध्यक्ष राहुल शिंदे पाटील, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, शिवसेनेचे युवा सेना तालुका प्रमुख नितीन शेळके, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष मंगेश लाळगे, राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले, निघोजच्या सरपंच चित्राताई वराळ पाटील, शिरूरचे नगरसेवक नितीन पाचर्णे,कोहकडीचे सरपंच डॉ. साहेबराव पानगे, गुणोरे गावचे सरपंच बाळासाहेब खोसे, उपसरपंच कचर कारखिले,म्हसे गावचे सरपंच प्रविण उदमले,माजी सरपंच सबाजी मेसे,माजी सरपंच तात्याभाउ राउत,माजी उपसरपंच यादवराव गोपाळे, अभ्युदय बॅंकेचे अधिकारी बन्सी ढवळे, शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, ज्ञानदेव कारखिले, कारभारी मेसे, बाजीराव गोपाळे, आप्पासाहेब बढे, आबासाहेब सागर, डॉक्टर बाजीराव गागरे, निलेश घोडे, अस्लमभाई इनामदार, पतसंस्थेचे अध्यक्ष मच्छींद्र मेसे, उपाध्यक्ष भाऊसाहेब बढे संचालक विजय मेसे,बन्सी बढे,अरुण जाधव,शरद गोपाळे,प्रकाश इंगळे, संदिप ढवळे, संचालिका मिना बढे,काजल खोसे सल्लागार विनायक बढे, भाऊसाहेब बढे,यादव गोपाळे, शंकर राउत, रोहिदास मेसे, आप्पासाहेब बढे, ज्ञानदेव कारखिले, नानाभाऊ बढे,भिमाजी दरेकर आदी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
ॲड.ठुबे यावेळी म्हणाले सहकारी चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा आर्थिक विकास झाला आहे.विश्वास फार महत्वाचा आहे.तो टिकवीण्यासाठी या चळवळीत वशिलेबाजी चालत नाही.हे संचालक मंडळाने ध्यानात घेतले पाहिजे.शिस्तबद्ध व्यवहाराला महत्व दिल्यास पतसंस्थेचा नावलौकिक होईल.अशाच पद्धतीने या पतसंस्थेच्या संचालक मंडळाने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ॲड.ठुबे यांनी व्यक्त केले.पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपाळे यांनी पतसंस्था स्थापन करण्याचा उद्देश सांगत पहिल्याच दिवशी पन्नास लाखांच्या ठेवी जमा झाल्या असून सर्वसामान्य जनतेला आर्थिक आधार देण्यासाठी पतसंस्था सहकाराच्या चौकटीत राहून काम करणार असल्याची ग्वाही गोपाळे साहेब यांनी दिली.

0 Comments