ग्रामरोजगार सेवकांच्या उत्कृष्ठ कामाबद्दल तालुकाध्यक्ष माऊली थोरात यांचा अण्णा हजारेंच्या हस्ते सन्मान
पारनेर प्रतिनिधी
रोजगार हमी योजनेच्या व पाणी फाउंडेशनच्या कामात उत्कृष्ट कामगिरी करून पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत राज्यात द्वितीय क्रमांक मिळवण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल व समृद्ध गाव योजनेच्या कामात केलेल्या योगदानाबद्दल पिंपरी जलसेन येथील ग्रामरोजगार सेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष माऊली थोरात यांचा जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेचा सन्मान सोहळा राळेगण सिद्धी येथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पाणी फाऊंडेशनचे प्रमुख डॉ अविनाश पोळ, पिंपरी जलसेन गावचे पाणी फाऊंडेशनचे प्रमुख जयहिंद चळवळीचे मार्गदर्शक गीतांजली उदय शेळके तसेच पिंपरी जलसेन येथील जलमित्र उपस्थित होते.

0 Comments