पारनेर तालुक्यातील तलाठ्यांनी मनमानी करून कामबंद आंदोलन केल्याच्या निषेधार्थ राळेगण थेरपाळ ग्रामस्थांचे भजन आंदोलन
सरपंच पंकज कारखीले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यालयासमोर भजन आंदोलन
तलाठ्यांनी कामावर हजर होऊन नागरिकांची कामे मार्गी लावण्याची मागणी
पारनेर प्रतिनिधी
गेली सहा दिवसांपासून गावोगावच्या कामगार तलाठ्यांनी कुणालाही पुर्वकल्पना न देता संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने कामगार तलाठ्यांनी कार्यालयात उपस्थीत राहण्यासाठी राळेगण थेरपाळचे सरपंच पंकजदादा कारखिले व ग्रामस्थांनी तलाठी कार्यालया समोर भजन आंदोलन केले.
यावेळी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. गेली सहा दिवसांपासून तहसीलदार ज्योती देवरे यांनी आम्हाला गेली दोन वर्षे अपमानास्पद वागणूक दिली. याचा निषेध करण्यासाठी तहसीलदार कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी,मंडल अधिकारी व काही गावांचे तलाठी यांनी तहसील कार्यालय परिसरात बैठा सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे.या आंदोलनामुळे गावगावचा कारभार ठप्प झाला आहे.बॅंक तसेच शेती संदर्भात व ईतर कागदपत्रे तलाठी कार्यालय बंद असल्याने मिळत नाही.याबाबत सरपंच पंकजदादा कारखिले यांनी गेली सहा दिवसांपासून सातत्याने कामगार तलाठी व वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क केला मात्र आमचा संप सुरू आहे एवढेच उत्तर संबंधितांकडून येत असते, दररोज प्रत्तेक गावचे ग्रामस्थ तलाठी कार्यालयात आवश्यक कागदपत्रे मिळण्यासाठी हेलपाटे मारतात,कार्यालय बंद पाहून संबंधित गावच्या सरपंचांना फोन करतात अशाप्रकारे लोकांना मानसिक त्रास होत आहे.या आंदोलनाची दखल कामगार तलाठी व तहसीलदार ज्योती देवरे यांनी घेण्याची गरज आहे,दखल न घेतल्यास कामगार तलाठी यांच्या घरापुढे भजन आंदोलन करुन कामगार तलाठी यांना तलाठी कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती कारखिले यांनी दिली आहे. या आंदोलनाला योगेश आढाव,सुखदेव कारखीले, शशिकांत कारखीले,दीपक कारखीले, दिनेश कारखीले, सुयश कारखीले,मंगेश कार्ले, शिरीष कार्ले,सचिन गवळी,पोपट काने,राजू कारखीले,माऊली शितोळे, दामोदर कारखीले,निवृत्ती काणे,विलास कारखीले,अंकुश कारखीले,रवींद्र कारखीले,प्रसाद शितोळे, पोपट कारखीले,पांडुरंग बेंडाले, अतुल मोरे, नरेश सोनवणे, संदीप घावटे, बाजीराव रांजणे, बन्सी भानगडे, पंकज कारखीले, नाथा कारखीले, संभा आरनये, शंकर इंगळे, बाळकृष्ण कारखीले,सदाशिव कारखीले, बाजीराव शेवकर, राहुल मोरे, नवनाथ देडगे, संकेत कारखीले,अनिकेत कारखीले,अक्षय कारखीले, अभि कारखीले, विनोद कारखीले, गणेश रामकर, विशाल रामकार, विकी खोदडे, आदींसह अनेक ग्रामस्थ उपस्तीत होते.

0 Comments